अन् बांधकाम सुरू असताना जेसीबीत अडकला नाग…

सर्पमित्राने दिले जखमी नागाला जीवदान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बांधकाम सुरू असताना जेसीबीमध्ये अडकून जखमी झालेल्या नागाला सर्पमित्रांनी उपचार करून जीवदान दिले. अविनाश हिवलेकर व गजू क्षीरसागर असे हा सर्पमित्रांचे नाव आहे. नागाला आज केसुर्ली येथील जंगलात सोडून देण्यात आले. 

राजूर कॉलनी येथे सबित अली हे राहतात. त्यांच्या घरासमोर शिव मंदिराचे काम सुरू आहे. दरम्यान दुपारी 4 वाजताच्या सुमारास जेसीबीने काम सुरू असताना जेसीबीच्या फावड्यात एक नाग अडकल्याचे चालकाला आढळून आले. त्यांनी तात्काळ सर्पमित्र अविनाश हिवलेकर यांना फोन करून याची माहिती दिली.

सर्पमित्र अविनाथ हिवलेकर व सर्पमित्र गजू क्षीरसागर हे दोघेही तात्काळ राजूर येथे गेले. त्यांनी नागाला ताब्यात घेतले असता त्यांना नाग जखमी असल्याचे आढळून आले. संध्याकाळी पशू चिकित्सालय बंद असल्याने त्यांनी आज नागाला वणीतील पशू चिकित्सालयात नेऊन नागावर उपचार केला. त्यानंतर त्या नागाला सुरक्षीतपणे केसूर्लीच्या जंगलात सोडून देण्यात आले.

सापाला मारू नका, सर्पमित्रांना संपर्क साधा
अनेक साप हे विषारी नसतात. मात्र गैरसमजातून त्यांना ठार मारले जाते. साप हे पर्यावरणाचा समतोल राखतात. त्यामुळे कुठे साप निघाल्यास त्याला न मारता परिसरातील सर्पमित्रांना संपर्क साधा असे आवाहन सर्पमित्र अविनाथ आणि गजू यांनी केले आहे.
सर्पमित्र संपर्क क्रमांक – हरिष कापसे (वणी) – 9373462024
अविनाश हिवलेकर (वागदरा) – 8080244250
गजू क्षीरसागर (केसुर्ली) – 9284870679

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.