अवैध मांस विक्रेत्यांवर छापा, 370 किलो गौमांस जप्त

मोमीनपुरा व रजानगर येथून 7 जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मोमीनपुरा व रजानगर भागात धाड टाकून वणी पोलिसांनी 370 किलो प्रतिबंधित गौमांस जप्त केला. पोलिसांनी गौवंश कत्तल करुन मांस विकणाऱ्या 7 जणांना दोन्ही ठिकाणहून अटक केली आहे. 
राज्यात गौवंश हत्या व गौमांस विक्रीवर प्रतिबंध आहे. असे असताना शहरात गौमांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार शाम सोनटक्के याना मिळाली होती. माहितीवरून ठाणेदार सोनटक्के यांनी पोलीस स्टाफसह रविवार 23 जानेवारी रोजी पहाटे मोमीनपुरा व रजानगर भागात धाड टाकली.  पोलिसांनी तेथील काही राहत्या घरात साठवून ठेवलेला 51800 रुपये किमतीचा 370 किलो गौमांस जप्त केला.
अवैध गौमांस साठवणूक व विक्री प्रकरणी पोलिसांनी मोमीनपुरा येथून मो.नसीर अ. रशीद, अनिस अब्दुल रशीद कुरेशी, मो. कैसर अ. अजीज कुरेशी, मो.पाशा अ. अजीज कुरेशी, मो. एजाज अ. अजीज कुरेशी व अब्दुल वासे अ. वाहिद याना अटक केली. तर रजानगर भागातून मो. इस्तीयाक अ. वहाब कुरेशी याला अटक केली.  अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपी विरुद्द महाराष्ट्र प्राणी संरक्षक कायदा कलम 5 (ब) (क), 9, 9 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात पोनि शाम सोनटक्के, पीएसआय प्रवीण हिरे, शिवाजी टिपूर्णे, अशोक टेकाडे, हरींदर भारती, विशाल गेडाम, अमोल अनेलवार, प्रगती काकडे, छाया उमरे यांनी यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास पीएसआय प्रवीण हिरे व  शिवाजी टिपूर्णे करीत आहे.
हे देखील वाचा- 

वणी पोलिसांकडून अनेक तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.