गोवंश तस्करी करताना 9 जणाची टोळी जेरबंद, शिरपूर पोलिसांची धडक कारवाई

8 वाहनात 25 जनावरांसह 42 लाखाचा मुद्देमाल जप्त, कत्तलीसाठी मोठ्याप्रमाणात गोवंशची तेलंगणात तस्करी

जितेंद्र कोठारी: वणी: गोवंश तस्करी करून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणारे 25 जनावरे आणि नऊ जणांची टोळी शिरपूर पोलिसांनी जेरबंद केली आहे. शिरपूरचे थनेदार गजानन करेवाड व पोलिस कर्मचार्‍यांनी रविवार 23 जानेवारी रोजी सायंकाळी ही धडक कारवाई केली. पोलिसांनी जनावर भरून असलेले 8 पीकअप वाहन व त्यात कोंबून भरेलेल 25 गोवंश जनावर असे एकूण 42 लाख 47 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांना शिरपूर मार्गे आदिलाबाद येथे जनावर तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. महितीवरुन सपोनि गजानन करेवाड व पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे यांनी पोलीस पथकासह सादया वेशात सापळा रचून शिरपूर पोलिस स्टेशन समोर 2 व वणी मुकुटबन मार्गावर चेंडकापुर फाटा येथे 6 पिकअप वाहने थांबून झडती घेतली. चौकशी दरम्यान पोलीस पथकाला वाहनामध्ये निर्दयीपणे कोंबून असलेले गोवंश जनावरे आढळले. वाहन चालकांना जनावर वाहतुकीबाबत विचारपुस केली असता वाहन चालकाने उडवा-उडवीची उत्तरे दिली.

पोलिसानी वाहनचालक अनिल देवीदास आत्राम रा. कायर, सचिन महादेव थेरे रा.कुंड्रा, अमीत गजानन पोटे रा. सुर्ला, अफजल बेग अफसर बेग रा. कायर, भोळाराम सुरेश पडोळे रा. डोर्ली, विश्वजित विलास ताजने रा. बाबापूर, अजय भारत पिदुरकर, रा. सुर्ला, नितिन राजेंद्र नरोटे रा. एरव्हा ता. जिवती व बालाजी अरुण थोरात रा.डोंगरगाव यांना अटक करून महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1995 (सुधारीत) कलम 5(ए), पशु क्रूरता अधिनियम 1960 चे कलम 11 (डी).(ई).(एच) सह मो.वा कायदा कलम 83/177 सह महाराष्ट्र पोलीस अधीनियम कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गोवंश तस्करांच्या ताब्यातून सोडविण्यात आलेल्या जनावरांना रासा येथील गौशाला मध्ये पाठविण्यात आले आहे.

सदर कार्‍यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सपोनि गजानन करेवाड, पीएसआय रामेश्वर कांडुरे, प्रविण गायकवाड, गंगाधर घोडाम, सुगत दिवेकर गजानन सावसाकडे, सुनिल दुबे, अमोल कोवे, निलेश भुसे विनोद मोतराव, विनोद काकडे, राहुल बोंडे, पल्लवी बल्की यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.