निषेध: वणी येथे उर्जामंत्र्याच्या पुतळ्याचे दहन
हेडगेवार बाबत वक्तव्याचे आरएसएस व भाजपतर्फे तीव्र निषेध
जितेंद्र कोठारी, वणी: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हेडगेवार बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करुन त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. संघ व भाजप कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी येथील टिळक चौकावर जमा होऊन नितीन राऊत विरुद्द तीव्र घोषणाबाजी केली. त्यानंतर ऊर्जामंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी अध्यक्ष स्व. डॉ. हेडगेवार यांनी ब्रिटिश शासनाच्या भीतीने नाशिक येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे खाजगी सचिवांना भेटण्यास नकार दिला. तसेच त्यासाठी त्यांनी आजारी असल्याचा बहाणा केल्याचे विधान ऊर्जामंत्री राऊत यांनी सोमवार 24 जाने. रोजी वणी येथे केले होते.
हेडगेवार बाबत केलेल्या बेताल व्यक्तव्याचे निषेध म्हणून संघ व भाजप कार्यकर्त्यांनी नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले. निषेध करताना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी उपाध्यक्ष नप वणी श्रीकांत पोटदुखे, रवी बेलूरकर, संजय पिंपलशेंडे, राकेश बुग्गेवार, आरती वांढरे तसेच भाजपचे इतर कार्यकर्ता उपस्थित होते.
Comments are closed.