जितेंद्र कोठारी, वणी:रिव्हर्स घेणा-या एका ट्रकने इलेक्ट्रिक पोलला जबर धडक दिली. या धडकेमुळे नजिक असलेल्या डीपीने अचानक पेट घेतला. ग्रामीण रुग्णालय परिसरात आज संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. डीपी जळाल्याने ग्रामीण रुग्णालयाची लाईट गेली असून संपूर्ण ग्रामीण रुग्णालय अंधारात गेले आहे.
सध्या वणीतील ग्रामीण रुग्णालयात बांधकाम सुरू आहे. संध्याकाळी 6.45 वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय परिसरात एक ट्रक (MH 29 BE0692) रेती घेऊन आला होता. रेती टाकण्यासाठी गाडी रिव्हर्स घेताना ट्रक इलेक्ट्रिक पोलला धडकला. यामुळे पोल वाकला. मात्र याचा परिणाम जवळच असलेल्या डीपीवर होऊन डीपीने लगेच पेट घेतला.
दरम्यान डीपी खालील झाडे जळाली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील व रुग्णालयातील कर्मचा-यांनी त्वरित सदर आग विझवली. या आगीत नुकसान झाले नसले तरी डीपीला आग लागल्याने रुग्णालयाची लाईट गेलेली आहे.
ग्रामीण रुग्णालय अंधारात डीपी जळाल्याने संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाची लाईट गेली आहे. सध्या इनव्हरटरच्या मदतीने काही बल्ब सुरू करण्यात आले आहे. मात्र यामुळे आणखी अवघे दोन तास लाईट सुरू राहण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच विद्युत वितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहे. डीपीचे काम सुरू असून दोन तासांमध्ये लाईट येण्याची शक्यता न दिसल्यास जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार यांनी दिली.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.