डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
बहुजन समाज पार्टीतर्फे देण्यात आले निवेदन
सुनील बोर्डे, वणी: वणी नगर पालिका हद्दीत येणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनायल हे नगर पालिकेच्या हलगर्जीपणामुळे दुर्लक्षीत झाले आहे. त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत बहुजन समाज पार्टीच्या वतीने नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हे कमानीजवळ असून अनेक वर्षांपासून हे वाचनालय सुरू आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज या वाचनालयाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे वाचन प्रेमीमध्ये याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बसपाने याविषयी निवेदन देऊन नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी या वाचनालयाबाबत सविस्तर चर्चा केली. 25 नोव्हे पर्यंतजर हा प्रश्न निकाली काढला नाही, तर 26 नोव्हेंबर संविधान दिना पासून डॉ. बाबासाहेब आबेडकर चौकात बसपा आमरण उपोषणाचा बसेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी बसपाचे अध्यक्ष बबलू भाऊ मेश्राम, जिल्हा प्रभारी प्रवीण खानझोडे, ऍड राहुल खापर्डे, तालुका उपाध्यक्ष मंगेश सोनुने, शहर अध्यक्ष संजय हनुमंते, सचिव प्रमोद येडलावर, अनिल सातपुते, प्रशांत डांगरे, शंकर चटप, युवराज पेटकर, महेश टिपले, राकेश वाघमारे, अर्जुन मस्के, सुरेंद्र आस्कर उपस्थित होते. या अगोदर बहुजन स्टुडंन्ट्स फेडरेशन द्वारा निवेदन दिले होते पण या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली होती हे विशेष.