ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी तालुक्यातील सर्व सरकारी आरोग्य उपकेंद्र हे आज निव्वळ शोभेची वस्तू बनलेले आहे. सरकारी खर्चातून उभ्या केलेल्या लाखों रुपयांच्या इमारती धुळ खात पडून आहे. त्याला कोणीही वाली नाही. ग्रामीण भागामध्ये आरोग्याचा कोणताही प्रश्न उभा राहिल्यास रुग्नास शहरातील खाजगी दवाखान्यात हलविल्याशिवाय गत्यंतर नाही. प्रसंगी अनेक रुग्नांना प्राण गमवावा लागतो. अश्या प्रकारे रुग्णांची हेडसांड होत आहे.
यंत्रणा चालविण्यासाठी जे मनुष्य बळ पाहिजे ते आज रिक्त आहे. ही रिक्त पदे भरल्यास सेवा मिळू शकते तसंच अनेक लोकांना सरकारी नोकरीही मिळू शकते. या सर्व जागा सरकारने भराव्या व ग्रामीण भागातील गोर गरीब लोकांना चांगली आरोग्य सेवा द्याव्या अशी मागणी संभाजी ब्रिगेड वणीच्या वतीने करण्यात आली.
येत्या पंधरा दिवसात या विषयावर कोणतीही कार्यवाही न झाल्यास संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अजय धोबे, अमोल टोंगे, निलेश झाडे, शंकर निब्रड, अक्षय राजुरकर, आकाश खुलसंगे, शुभम केळकर, दत्ता डोहे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post