वणीत वंचित बहुजन आघाडीचा वर्धापनदिन साजरा
आगामी निवडणुकीच्या तयाारीला लागण्याचे जिल्हाध्यक्षांचे आदेश
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीत वंचित बहुजन आघाडीचा तिसरा वर्धापण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. झरी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने वंचितने आपले खाते उघडले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित आपले खाते उघडेल असा विश्वास लोळगे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला. यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्त्या किशोरी ताजने यांनी वंचितमध्ये जाहीर प्रवेश घेतला.
वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष 3 वर्षांपूर्वी स्थापन झाला. यात वंचित घटकातील लोकांना स्थान देण्यात आले असून अशा घटकांच्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कार्यकत्यांनी कामाला लागावे असे मनोगत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित लक्ष्मीकांत लोळगे यांनी व्यक्त केले. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा धम्मावती वासनिक यांनी महिलांच्या संघटनेचे महत्व पटवून दिले.
यावेळी वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, तालुकाध्यक्ष दिलीप भोयर, शहराध्यक्ष किशोर मुन, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा डॉ. काजल गायकवाड, शराध्यक्षा अर्चना नगराळे, शहरमहासचिव डॉ. प्रा. आनंद वेले, पुष्पाताई शिरसाट, तालुकाउपाध्यक्षा करुणा पाटील, भारती सावते, देवानंद झाडे, गौतम जीवणे, शंकर रामटेके, दादाजी घडले.
प्रवीण वनकर, बुधघोष लोणारे, राजू लोहकरे, भारत कुमरे, अजय खोब्रागडे, प्रा आसुटकर, निवृत्ती ताजने, सुषमा दूधगवळी, वैशाली गायकवाड, प्रतिमा मडावी, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या उपस्थितीत केक कापून वंचितचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.
हे देखील वाचा:
‘निर्गुडे’च्या पूर प्रतिबंधित क्षेत्रात उभ्या झाल्या टोलेजंग इमारती
Comments are closed.