दारूच्या नशेत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत घटना

जितेंद्र कोठारी, वणी:  दारूच्या नशेत विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत गोवारी (पार्डी) गावातील सदर घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शंकर हुसेन किनाके (30) रा.गोवारी (पार्डी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 
Podar School 2025

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्राप्त माहितीनुसार मृतक शंकर किनाके आपल्या पत्नीसह मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत होता. शंकरला दारुच्या व्यसनामुळे पती पत्नीचे नेहमी भांडण व्हायचे. रविवार 17 एप्रिल रोजी पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण होऊन त्याची पत्नी घर सोडून निघून गेली. पत्नी घर सोडून गेल्यामुळे व्यथित शंकर किनाके यांनी भावाला फोन करून आत्महत्या करतो अशी धमकी दिली. पण दारू पिऊन नेहमी धमक्या देत असल्यामुळे त्याच्या भावानेसुद्दा शंकरच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही.
मात्र सोमवारी पहाटेच्या दरम्यान शंकर यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. आत्महत्येच्या घटनेबाबत शिरपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतकाच्या प्रेताची वणी ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणी करुन शव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास सपोनि गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलीस करीत आहे.

Comments are closed.