वणीत जलसाक्षरतेसाठी निघाली भव्य सायकल रॅली

जलशक्ती अभियान हे जनांदोलन व्हावे:अभिजित वायकोस

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगर परिषद वणीच्या वतीने आज केंद्र शासनच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा २.० अंतर्गत “जलशक्ती” अभियानाची सुरवात सायकल रॅलीने करण्यात आली. न.प. प्रांगणातून सकाळी 6.30 वाजता ही सायकल रॅली निघाली. या सायकल रॅलीमध्ये शहरातील नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

न.प. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनात निघालेली ही सायकल रॅली न.प. कार्यालय – कमान चौक- खाती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या सायकल रॅलीचे सभेमध्ये रुपांतर झाले. जलशक्ती अभियानांतर्गत जलसंधारण व रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम, पारंपरिक जलस्त्रोतांचे नूतनीकरण व पुनर्भरण, विंधन विहिरींची भूजल पातळी वाढविणे, वृक्ष लागवड व संवर्धन आणि पाणलोट क्षेत्र विकास मुख्य पाच घटकांद्वारे जलसंधारण आणि जलसुरक्षेवर भर दिला जाणार आहे.

सभेमध्ये रुपांतरीत झालेल्या या सायकल रॅलीसभेला मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले की ” जलशक्ती अभियान हे जनांदोलन व्हावे” आणि यामध्ये वणी शहरातील सर्व नागरीकांने सक्रीय सहभाग नोंदवावा असे त्यांनी आवाहन केले.

ते पुढे म्हणाले की, वणी शहराची लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने उपलब्ध पाणी कमी पडत आहे. त्यामुळे पडणारे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यासाठी “जलशक्ती अभियानाची” सुरुवात नगर परिषदेने केली आहे. त्यामुळे पडणारे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यासाठी न.प.स्तरावर जलशक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. वणी शहरातील प्राचीन विहिरी आणि जलस्त्रोत यांचा विकास करण्यात येईल. याचाच भाग म्हणून सिंगाडा तलावाचे कामपूर्णत्वास येत आहे आणि त्या ठिकाणी एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून त्याला विकसित करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

पावसाचा थेंब न थेब जमिनीत जिरवला पाहिजे यासाठी जलव्यवस्थापन याचा अर्थ समाज व पाणी यांच्यातील संबंध प्रस्थापित करून पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत पटवून देणे होय यासाठी पावसाचे पाणी जेव्हा व जिथे पडेल तिथे साठवणे. जमिनीवर किंवा जमिनीच्या खाली ते साठेल अशा रीतीने व्यवस्था करनाऱ्या नागरिकांना मालमत्ता कारमध्ये सूट देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्याचा आणि तो मंजूर करून घेण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

या सायकल रॅलीचे आयोजन प्रकल्प अधिकारी जयंत सोनटक्के, खुशाल भोंगळे, विजय महाकुलकर, संदीप पाटील, धम्मरत्न पाटील, तायडे, माधव सिडाम, संजय ताराचंद, मयूर,परसावार सर तसेच न.प चे सर्व शिक्षक वृंद,विक्की करसे, पोर्णिमा शिरभाते, मनीषा,रेखा, इत्यादी आणि लॉयन्स इंग्लिश स्कूल चे शिक्षक वृंद व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. या सायकल रॅलीचे संचालन उत्तम हापसे यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंत सोनटक्के यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.