लोकमान्य टिळक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते उद्घाटन
जितेंद्र कोठारी, वणी : शिक्षण प्रसारक मंडळद्वारे संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे आंतरविद्याशाखीय संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप मालखेडे यांच्या हस्ते शनिवार दि. 7 मे 2022 रोजी या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
परिषदेमध्ये विविध शैक्षणिक संस्थामधून तब्बल 242 प्राध्यापक तथा शैक्षणिक व्यक्तिमत्व सहभागी होणार आहेत. तसेच 132 प्राध्यापकांसह 50 आचार्य पदवी संशोधक विद्यार्थी तथा 60 पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून स्थानिक पातळीवर देखील नोंदणी होणार आहे. विशेष म्हणजे जर्मनी येथील डॉ. रवींद्र जुमडे आणि डॉ. अमितकुमार फुलझेले आंतरराष्ट्रीय परिषदेला ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. रिझवान अहमद, डॉ. रोहन टाकसाळे तथा डॉ. दीपाली मालखेडे या मान्यवरांचे वैशिष्ट्यपूर्ण विषयावर मार्गदर्शनही लाभणार आहे. परिषदेचा समारोप वणी विधानसभा सदस्य संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. अशी माहिती लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा परिषदेचे समन्वयक डॉ. सौ सुनंदा आस्वले आणि प्रा. ज्ञानेश्वर खामनकर यांनी दिली आहे.
Comments are closed.