परिसर स्वच्छ करण्यासाठी निवृत्त शिक्षकाने उचलला झाडू
80 वर्षांच्या शिक्षकाचे तरुणाला लाजवेल असे काम
राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील मुकुटबन हे ठिकाण तालुक्यातील महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी नागरिकांची वरदळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मुकुटबन बसस्थानकावर कचरा व घाणीचे प्रमाण देखील जास्त आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे या स्थानकावर बसणाऱ्या नागरिकांना यांचा खुप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेक नागरिक बस स्थानकावर बसन्यास देखील टाळतात. मात्र ही सफ़ाई कुणी करायची याचा विचार कुणीच करत नाही. मात्र बसस्थानकावरचा कचरा साफ करण्याचा विडा एका 80 वर्षांच्या शिक्षकानी उचलला आहे.
रुइकोट येथील रहिवाशी असलेले माजी शिक्षक तानबा झिबल टोंग वय 80 वर्ष यांनी स्वतः हातात झाड़ू घेऊन संपूर्ण बसस्थानक झाडून काढला. या बस स्थानकावरील जागा त्यांनी सर्व घाण साफ करुन नागरिकांना त्या ठिकाणी बसण्यायोग्य करुन दिली. या त्यांच्या कार्याला या परिसरातील नागरीकाकडून खुप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. या माजी आदर्श शिक्षकानी स्वच्छतेचे कार्य करुण लोकांना स्वच्छतेचे महत्व पाठवून दिले आहे.
एकीकडे आपल्या देशात स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम राबलवा जात आहे. या मधून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पठवून दिले जात आहे. पण ते कोणीही आत्मसात करताना दिसून येते नाही. मात्र या माजी शिक्षकानी हे कार्य करुन तरुण पिढीला स्वच्छतेची जाणीव करुण दिली आहे. हा आदर्श सर्वानी डोळ्या समोर ठेऊन स्वच्छ भारत बनवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.
या अगोदर मुकुटबन हे बसस्थानक रामदास वरगंनटिवार हे 80 वर्षाचे रुद्ध झाडत होते. मात्र मागील महिन्यात त्यांचा अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हे बस स्थानक झाडणारा वाली गेला. तेव्हा पासून या कड़े कोणाचेही लक्ष्य नव्हते. त्यामुळे या ठिकाणी कचराचे प्रमाण वाढले होते. या दुर्गधी कड़े बघून माजी आदर्श शिक्षकानी हातात झाडू उचलला व संपूर्ण बस स्थानक झाडून टाकले. त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.