सुसाट बाईकस्वारांना आळा घालण्यास वणी वाहतूक पोलीस हतबल

राजकीय पुढारी आणि अवैध व्यावसायिकांच्या मुलांना मिळतंय पाठबळ

0

रवी ढुमणे, वणी: सध्या वणीत अवैध प्रवासी वाहतूक, कोळसा ओव्हरलोड आणि सुसाट बाईकस्वारांना वणी पोलीस वाहतूक उपशाखेकडून मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे. केवळ राजकीय पुढारी, अवैध व्यावसायिक यांच्या मुलांना पाठबळ देत खुद्द सहायक पोलीस वाहतूक पोलीस निरीक्षक आवाच्च शिवीगाळ करीत आहेत. मात्र शहरातील वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा वाजला असून लालपुलियातील ट्रान्सपोर्ट धारकाकडून वसुली करण्यासाठी खास शिपायाची नेमणूक केली आहे. इतकेच नव्हे तर गाव खेड्यातील सामान्य माणसांना ओळखून त्यांना वेठीस धरण्याचे काम वाहतूक पोलीस करत आहे. सध्यातरी वणी वाहतूक पोलीस केवळ वसुलीत दंग असल्याने सामान्य माणूस मात्र हतबल झाला आहे.

वणी शहरातील कोळसा वाहतूक, ट्रान्सपोर्ट कंपनी व वाढते प्रवासी वाहतूक बघता जिल्हा पोलीस विभागाने येथे वाहतूक उपशाखेची निर्मिती केलीय. मागील काळात पोलीस ठाण्यात असलेले चार शिपाई इतक्या मोठ्या वाहतुकीला व्यवस्थित सांभाळत होते. केवळ चार कर्मचारी असताना येथील वाहतूक सुरळीत होती. मात्र आता वाहतूक उपशाखा केवळ वसुलीचा अड्डा बनला आहे. केवळ गावात घिरट्या घालून देखावा दाखवीत शहरातील सुसाट बाईकस्वार व प्रवासी वाहतुकदारांना अर्थपूर्ण पाठबळ देतांना दिसत आहे.

ग्रामीण भागातील माणूस शहरात दाखल झाला की त्याला हेरून त्याच्याकडून दंड वसूल केल्या जात आहे. घाबरलेला खेड्यातील माणूस शिपायाच्या खाकी तोऱ्याला बळी पडत खिशातील रक्कम देत आहे. मात्र शासकीय वसुलीचा भरणा करतांना यातील काही शिपाई “अर्धे तुम्ही आणि अर्धे मी” अशी भूमिका बजावीत असल्याचे दिसून येत आहे. हा वाहतूक पोलीस चौकात कधी दिसतच नाही. आडोशाला लपून माहिती नसणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून केवळ वसुली करण्यात दंग आहे.

शहरात एकेरी वाहतूक असतांना येथील वाहतूक शिपाई जनतेला मार्ग दाखविताना कधी दिसलाच नाही. बाजारपेठेतील प्रतिष्ठाने असलेल्या व्यावसायिकांकडून वसुली करीत त्यांना रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्याची मुभा देत आहे तर दुसरीकडे सामान्य माणसाला वेठीस धरण्याचे कार्य वणी वाहतूक उपशाखा करीत आहे. एखाद्याने विचारणा करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कलमा सांगून दमदाटी करण्याचा एकसूत्री कार्यक्रम येथील वाहतूक विभाग करताना दिसत आहे.

शहरातील वर्दळीच्या मार्गावर सुसाट वेगाने जाणारे बाईकस्वार दररोज जणू स्पर्धा लावत आहे. या दुचाकीच्या स्पर्धेत मात्र सामान्य माणसाला अपघात होऊन प्राण गमविण्याची वेळ आली असतांना जणू वाहतूक शाखा त्यांना पाठबळच देतांना दिसत आहे. लायन्स कॉन्व्हेंट, बायपास, वरोरा मार्ग,आणि बसस्थानक ते साई मा मंदिर या रस्त्यावरून रात्रीचे सुमारास रेस चे तांडव बघायला मिळत आहे. मात्र वाहतूक विभाग फक्त समान्यांवर कारवाई करून आपला लेखाजोखा पूर्ण करीत आहे. दरडोई हजारो प्रवासी वाहने, ट्रान्सपोर्ट धारकांचे भर रस्त्यावर उभे असलेले ट्रक,इतकेच नव्हे तर विरुद्ध दिशेने ट्रान्सपोर्ट कंपनीचे ट्रक भरधाव येतात त्यांना ही वाहतूक शाखेकडून अर्थपूर्ण पाठबळ मिळत आहे.

लालपुलियातील ट्रान्सपोर्ट कंपनी व ट्रक चालकाकडून वसुली करण्यासाठी खास शिपायाची नेमणूक केली आहे. राजकीय पुढारी ,प्रतिष्ठीत आणि अवैध व्यावसायिकांचे संबंध जोपासत वणीतील बेशिस्त वाहतुकीला वाहतूक विभाग पाठबळ देत आहे. तर सामान्य दुचाकीस्वारांना आर्वाच्च शिवीगाळ करून धमकविण्याचे प्रकार येथील वाहतूक पोलीस शाखा निरिक्षक करताना दिसले आहे.

नियम केवळ समण्यासाठीच तयार करण्यात आले आहे. सामान्यांना वेठीस धरून सुसाट बाईकस्वारांना आळा घालण्यात वणीची वाहतूक पोलीस उपशाखा सपशेल अपयशी ठरली आहे. सोबतच अवैध प्रवासी वाहतूक व ट्रान्सपोर्ट, आणि बाजारपेठेतील दुकानदारांकडून वसुली करीत शहरातील रस्त्यावर वाहने लावायला मुभा दिली जात आहे. या गंभीर प्रकारची पोलीस अधीक्षक दखल घेणार का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Attachments area

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.