ग्रामीण रुग्णालयात आयुर्वेदिक व होमिओपॅथी रोगनिदान व उपचार शिबिर
वणी (रवि ढुमणे): राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुष विभाग अंतर्गत वणीच्या ग्रामीण रुग्णालयात 7 डिसेंबर,23 डिसेंबर व 25 जानेवारीला आयुर्वेदिक व होमिओपॅथी रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा गरजुनी लाभ घेण्याचे आवाहन आयुष विभागातील डॉ विवेक गोफणे व डॉ अरुण विधाते यांनी केले आहे.
वणी ग्रामीण रुग्णालयातील आयुष विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आयुर्वेदिक व होमिओपॅथी रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन 7 डिसेंबर, 23 डिसेंबर व 25 जानेवारीला केले आहे. या शिबिराची वेळ सकाळी 9 ते 12 पर्यंत असणार आहे. आयुर्वेदिक उपचारात संधिवात कंबर दुखणे, मधुमेह, आम्लपित्त, यावर उपचार आयुर्वेद तज्ञ डॉ विवेक गोफणे करणार आहे.
होमिओपॅथी उपचारात त्वचारोग, फुफ्फुसाचे आजार, मुतखडा, यावर निदान व उपचार होमिओपॅथी तज्ञ डॉ अरुण विधाते करणार आहे. वरील सर्व उपचार मोफत करण्यात येणार असून या शिबिराचा गरजुनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ विवेक गोफणे व डॉ अरुण विधाते यांनी केले आहे. हे शिबीर ग्रामीण रुग्णालय वणी येथे होणार आहे.