वणीत दैनिक अभिकर्ता असोसिएशनचे गठन

सागर बोढे अध्यक्ष तर सचिवपदी अविनाश कडू यांची अविरोध निवड

जितेंद्र कोठारी, वणी : मागील काही वर्षांत शहरात पतसंस्थेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. या पतसंस्थेच्या दैनिक बचत अभिकर्त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. अभिकर्ते पतसंस्थेच्या हिताकरिता कर्तव्य बजावतात. मात्र पतसंस्था कडून अभिकर्त्याच्या भविष्याची कुठलीही हमी घेतली जात नाही. त्या सर्व अभिकर्त्यांना स्वतःच्या न्यायहक्कसाठी एकसंघ करण्याची जबाबदारी दैनिक अभिकर्ता असोसिएशनने उचलली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी सागर बोढे तर सचिव म्हणून अविनाश कडू यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

पतसंस्थेच्या हिताकरिता रात्रंदिवस झटणारे अभिकर्ते यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना संस्थेच्या माध्यमातून सुरक्षा कवच पुरविण्यात येत नाही. संस्थेने त्यांचा अपघात तसेच आरोग्य विमा काढणे गरजेचे आहे. भविष्य निर्वाह निधी बाबतही संस्थेने सकारात्मक असणे गरजेचे आहे. अभिकर्त्यांना मिळणारा मोबदला अत्यल्प आहे. अशा विविध समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न असोसिएशन करणार आहे.

दैनिक अभिकर्ता असोसिएशनच्या कार्यकारणी मध्ये उपाध्यपदी अभिकर्ता तेजराज ठाकरे, प्रमोद शिवरात्रीवर, कोषाध्यक्षपदी महेंद्र टिकणायत, सहसचिव शेख शपाद यांची निवड करण्यात आली. कार्यकारणी सदस्य म्हणून दिलीप दरवरे, भास्कर बोदाडकर,भारत लिपटे, अशोक हेपट, योगेश गोवरदीपे याना समाविष्ट करण्यात आले आहे.

अभिकर्ता असोसिएशनमध्ये राजेश माळीकर, नरेंद्र सपाट, मोहन हेपट, साहिर पठाण, कैलास पचारे, विनोद महाजनवार, प्रफुल बांगळे, फिरोज खान, गजानन बत्तूलवार, जितेंद्र पाऊनकार, रुपेश कुचेरीया, विजय पिंगे, कपिल भारवानी, अशोक अंकतवार, भूषण पारवे, अतुल वाटेकर, श्रीतेश दुरुतकर, चंदन वाघमारे, अजय चिंचोलकर, हनिफ शेख, रितीक शिवणीतवार या अभिकर्त्यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

दैनिक अभिकर्ता असोसिएशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, अभिकर्त्यांच्या पाल्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याकरीता विविध उपक्रम असोसिएशनच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सागर बोढे यांनी दिली.

Comments are closed.