डॉ. रेखा म. बडोदेकर यांचा उत्कृष्ट संशोधनकरिता सन्मान

'सावित्रीबाई फुले एमिनन्ट रिसर्चर नॅशनल अवॉर्ड 2022' ने सन्मानित

विवेक तोटेवार, वणी: आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर, कर्मवीर महाविद्यालय मुल, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर, त्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद प्रायोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती पर्वावर आंबेडकरवादी दृष्टीकोन या विषयावर आधारित दोन दिवसीय आंतरविद्याशाखीय, आंतरराष्ट्रीय परिषद 25 व 26 जून 2022 रोजी संपन्न झाले. या परिषदेत आंबेडकरी चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी. जी. यवतमाळ येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. रेखा मनोहर बडोदेकर यांना “सावित्रीबाई फुले एमिनन्ट रिसर्चर नॅशनल अवॉर्ड 2022” ने सन्मानीत करण्यात आले.

डॉ. रेखा बडोदेकर ह्यांचे शिक्षण एम. ए. ,बी एड. ,एम.फिल. पीएच. डी. पर्यंत झालेले आहे आतापर्यंत त्यांचे विविध परिषदांमध्ये विविध विषयांवर 40 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहे. मॅडम फुले -शाहू -आंबेडकर ,त्यांच्या विचाराचे पाईक व अभ्यासक असून विविध सामाजिक, धार्मिक व संस्कृतीक कार्यक्रमात व्याख्याता म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.

त्यांनी आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यशाळेत महत्त्वपूर्ण विचार मांडले आहे. तसेच अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यामध्ये महत्त्वपूर्ण विचार मांडले आहे. डॉ. बडोदेकर यांचे आतापर्यंत तीन पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या “विदर्भातील आंबेडकरी चळवळीत दलित महिलांचे योगदान” ग्रंथाला 2021 मध्ये “म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार आणि विचार प्रसारक संस्था पुणे ” च्या वतीने उत्कृष्ट ग्रंथाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळींमध्ये असंख्य स्त्रियांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. मात्र त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आलेली नव्हती. अशा ह्या अनामिका स्त्रियांना प्रकाशात आणण्याचे कार्य डॉ. बडोदेकर मॅडम यांनी ग्रंथरूपाने केले. जो आज संदर्भ ग्रंथ म्हणून संशोधकांच्या उपयोगी येत आहे. आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशनच्या कार्यातही त्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा यथोचित गौरव व्हावा, या उद्देशाने आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशन तर्फे दिनांक 25 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. रेखा बडोदेकर यांना. सावित्रीबाई फुले उत्कृष्ट संशोधन राष्ट्रीय पुरस्कार, गोंडवाना विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, डॉ.प्रशांत बोकारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.