सावधान…! येत्या तीन दिवसात वणी तालुक्यात अतीवृष्टीची शक्यता

नदी व नाल्याकाठावरील नागरिकांना दक्षतेचा इशारा... नैसर्गिक आपत्ती आल्यास 'या' क्रमांकावर संपर्क साधावा...

जितेंद्र कोठारी, वणी: येत्या तीन दिवसांमध्ये वणी तालुक्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो. असा इशारा नागपूर येथील हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व नागरीकांनी तसेच नदी व नाल्या काठावरील नागरीकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे.

याशिवाय नदी, नाल्याकाठावरील गावांनी कोणत्याही पुलावरून पाणी वाहत असल्यास त्या पुलावरून वाहतुक न करण्याची विनंती केली आहे. रांगण ते वणी या रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने तसेच तो पुल खचला असल्याने सदर रस्त्यावरून कोणतीही वाहतूक नागरिकांनी करू नये असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नैसर्गीक आपत्ती संदर्भात खालील क्रमांकावर संपर्क करावा

  • नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष यवतमाळ – 07232240720
  • नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष वणी – 07239227062
  • तहसीलदार. वणी मो. क्र. 9376809418
  • पोलीस निरिक्षक वणी – 8888825890
  • पोलीस निरिक्षक शिरपूर – 9527898484
  • पोलीस निरिक्षक मुकुटबन – 9823308230

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.