मारोतराव चोपणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

वृद्धाश्रमात धान्य, फळांचे वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सावर्लाचे माजी सरपंच तसेच वणी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारोतराव चोपणे ह्यांच्या 87 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिर तसेच चिखलगाव येथील बाजीराव महाराज वृद्धाश्रमात धान्य, फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे बाबाराव खांदनकर, सुमित चोपणे, चंद्रपूर व डॉ शुभांगी चोपणे, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष दिलिप मालेकर, मारोतराव चोपणे हे होते.

जेष्ठ नागरिक आणि वृद्धाश्रमातील नागरिकांसाठी चंद्रपूर येथील डॉ शुभांगी चोपणे ह्यांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तेथील आयोजित उदबोधन कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत बोन्डे यांनी केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप मालेकर यांनी केले, तर त्यांनी मारोतराव चोपणे ह्यांच्या कार्याचा गौरव केला. उपस्थितांचे आभार मारोतराव चोपणे यांनी मानले. कार्यक्रमास अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

मारोतराव भगवान चोपणे हे वणी तालुक्यातील सुपरिचित नाव आहे. ते मुळचे सावर्ला येथील आहे. 1957 -58 पर्यंत त्यांनी वणी तालुक्यात शिक्षक म्हणून काम केले. 1958 नंतर ते ग्रामसेवक म्हणून रुजू झाले. 1985-87 ह्या काळात ग्रामसेवक संघटनेचे उपाध्यक्ष, 1990-95 विस्तार अधिकारी म्हणून मारेगाव येथून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी 1995-90 मध्ये सावर्ला येथे बालाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. 2000-05 मध्ये सांवर्ला येथे ग्राम पंचायत सरपंच बनले, सावर्ला गावाला वणी तालुक्यातून आदर्श ग्राम म्हणून निवड व प्रथम पुरस्कार मिळवून दिला. याशिवाय त्यांची एक लेखक म्हणूनही ओळख आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.