नगरपरिषद निवडणूकीसाठी काँग्रेसची आढावा बैठक

इच्छुक उमेदवाराची चाचपणी व फॉर्म भरण्याची सूचना

जितेंद्र कोठारी, वणी : निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणासीवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक कार्यक्रम जाहीर केले आहे. निवडणुकीची घोषणा होताच स्थानिक राजकीय हालचालींना वेग आले आहे. वणी नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची आढावा बैठक मंगळवार 12 जुलै रोजी पार पडली. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या घरी आयोजित या बैठकीत माजी विधानसभा अध्यक्ष व निवडणूक निरीक्षक वसंतराव पुरके यांनी शहराची भौगोलिक व जातिगत स्थितीची माहिती जाणून घेतली.

वणी नगरपरिषद निवडणूकीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. मात्र दुसऱ्या टप्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. नगर परिषदवर काँग्रेसराज स्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने आतापासून तयारी सुरु केली आहे. कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन नागरिकांची समस्या जाणून त्याचे निराकरण करण्याचे प्रयत्न करावा. तसेच प्रभागनिहाय इच्छूक उमेदवारांचे फॉर्म भरून पाठविण्याचे आदेश निवडणूक निरीक्षक वसंतराव पुरके यांनी दिले.

या आढावा बैठकीत निवडणूक निरीक्षक वसंतराव पुरके, स्वाती येंडे, माजी आमदार वामनराव कासावार, प्रमोद निकुरे, डॉ. महेंद्र लोढा, प्रमोद वासेकर, राजाभाऊ पाथ्रडकर, आशिष खुलसंगे, जयकुमार आबड, ओम ठाकूर, जया पोटे, वंदना आवारी, संध्या बोबडे, सविता ठेपाले व इतर कार्यकर्ता उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.