जितेंद्र कोठारी, वणी : येथील एस.टी. बस स्थानकावर मंगळवारी सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. प्रवासी बसण्याच्या फलाटावर एक इसम मृत असल्याची सूचना बस स्थानक अधिकाऱ्यांनी सकाळी 7.30 वाजता दरम्यान वणी पोलीस स्टेशनला दिली. सूचनेवरून पीएसआय प्रवीण हिरे यांनी बस स्थानकावर जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मृतकाच्या अंगावर काळा रंगाचा चेक्सचा शर्ट व अंदाजे 38 वर्ष वय आहे. मृतकाची ओळख पटली नसून प्रेत ग्रामीण रुग्णालयच्या मोर्चरीमध्ये ठेवण्यात आले आहे. वरील वर्णनाचा मृतक कोणाचा ओळखीचा असेल तर त्यांनी वणी पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. असे आवाहन पोलिसांनी केले आहे
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.