“रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिक’चे आज उद्घाटन
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सुप्रसिद्ध रुग्णालय लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज सोमवार 15 ऑगस्ट रोजी ‘रीलीफ फिजिओथेरपी क्लिनिक’ चे उद्घाटन होणार आहे. क्लिनिकमध्ये फिजिओथेरपिस्ट डॉ. रौनक कोठारी स्पॉन्डिलिसिस (मानदुखी), सायटिका (कंबरदुखी), पॅरालिसिस (लकवा) अर्थोपेडिक, गुडघेदुखी व इतर हाडासंबंधी आजारावर अत्याधुनिक यंत्राद्वारे तसेच ड्राय निडलींग पद्धतीने उपचार करणार आहे.
वणी तालुक्यात व शहरात मानदु:खी, कंबरदुःखी व हाडासंबंधी आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहे. व्यायाम व फिजिओथेरपीद्वारे या आजारावर नियंत्रण मिळविता येते. कॉम्प्युटर व मोबाईलच्या दैनंदिन वापरामुळे हल्ली निम्हयाहून अधिक लोक मानेच्या व पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 40 वर्षावरील व त्याहून ही कमी वयाच्या दुचाकी चालकांना कंबरदुखी (सायटिका)चा त्रास होत आहे. ह्या आजारांवर फिजिओथेरपी सर्वाधिक योग्य आणि सुरक्षित उपचार पद्धत आहे. रुग्णाचा आजार व त्याची प्रकृतीनुसार फिजिओथेरपी कोर्सची कालावधी ठरविली जाते.
विविध आजारावरील रुग्णांना फिजिओथेरपीचा लाभ
फिजिओथेरपी म्हणजे रुग्णांसोबत मित्रत्वाने राहून त्यांच्या रोगावर योग्य निदान करुन त्यांना लवकर बरे करण्यात मदत करणे होय. व्याधीचे मूळ कारण शोधून काढून व्यायामाची शास्त्रीय पद्धतीने जोड देऊन दुखण्यावर मात करण्याची किमया फिजिओथेरपीमध्ये असते. त्यामुळे जुनी दुखणी, अपघातातील दुखापती, बदलत्या जीवनशैलीमुळे येणारे आजार, मानदुखी, खांदेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, स्नांयूच्या वेदना, टाचदुखी, स्ट्रोक, स्पोर्ट एन्ज्युरी, बेल्स पल्सी आणि पोस्ट फ्रॅक्चर यांसारख्या आजारांवर फिजियोथेरपीचा फायदा होतो.
फिजिओथेरपी नेमकी कधी घ्यावी?
पाठीच्या दुखण्यामध्ये मुख्यत्वे वेगवेगळी कारणे आहेत. लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, तणाव, स्नायू ताणून धरणे, चुकीच्या पद्धतीच्या बैठकी यामुळे हाडांमध्ये वा स्नायू दुखू लागले तर या फिजिओथेरपीच्या काही विशिष्ट दिवसांच्या कोर्सनंतर हे दुखणे आटोक्यात येते. मात्र, या आजाराची मूळ कारणं शोधून काढून त्यावर फिजिओथेरिपिस्टने सांगितल्यानुसार सवयी तसेच जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असते. खूप जड वस्तू उचलणे वा तासनतास एकाच जागी बसून राहिल्यानेही पाठीवर ताण येऊन पाठ दुखू लागते.
असहाय्य रुग्णांसाठी होम व्हिजिट सेवा
अत्यधिक वृद्ध, लकवाग्रस्त, शल्यक्रिया झालेले व डॉक्टरांनी चालण्यास मनाही केलेल्या रुग्णांसाठी रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिक कडून होम व्हिजिट सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
उपचारासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क करा:
डॉ. रौनक कोठारी (B.PTh (MUHS), CDNT)
रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिक
ग्राउंड फ्लोर, लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
बस स्थानाकासमोर, वणी जि. यवतमाळ
संपर्क क्र. 7620453515
Comments are closed.