आदर्श विद्यालयात वाहतुकीसंबंधी मार्गदर्शन
वाहतूक पोलीस निरीक्षक संग्राम ताठे यांनी साधला संवाद
वणी (सुनील बोर्डे): वणी येथील आदर्श विध्यालयात १२ डिसेंबरला वणीचे वाहतूक पोलीस निरीक्षक संग्राम ताठे यांनी विध्यार्थ्यांना वाहतुकीसंबंधी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक सुरेश घोडमारे होते.
अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांचे दुचाकी चालवण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. शालेय विद्यार्थी अतिवेगात वाहने चालवीत असल्याने प्रसंगी छोटे- मोठे अपघात घडत असतात. विनापरवाना गाडी चालविणे हा गुन्हा असून देखील अनेक पालक आपल्या पाल्यांना गाडी चालविण्यासाठी देतात. अशा वेळी अल्पवयीन मुलांसह पालक जबाबदार असतात. अपघात घडल्यास किंवा दुचाकी चालविताना मुले पोलिसांकडून पकडले गेल्यास पालकांवर गुन्हे दाखल होतात. म्हणून अल्पवयीन मुलांनी दुचाकी न चालविन्याच्या सूचना दिल्या.
शाळा परिसरात टवाळखोर मुले मुलींना त्रास देतात. त्यामुळे अनेक मुली शाळेत येण्यास घाबरतात. प्रसंगी भांडण- तंटे होतात. म्हणून मुलींना त्रास देणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यासाठी शाळेत पोलीस तक्रार पेटी लावण्याची सूचना दिली. शालेय जीवनात कळत नकळत होणाऱ्या चुकांमुळे आयुष्याला कलाटणी मिळते. म्हणून विद्यार्थी दशेत मुलां – मुलींनी जागरुक असणे गरजेचे असल्याचे मत संग्राम ताठे यांनी व्यक्त केले. वाहतुकीच्या नियमासंबंधी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन रमेश ढूमणे यांनी केले.आयोजन गजानन टेंमुर्डे, रविकांत उलमाले यांनी केले. याप्रसंगी रुपलाल राठोड, विकास बलकी, माणिक सोयाम, विलास ताजने, शंकर राठोड, विनय शेंगर, बाबाराव कुचनकर, यश भोयर, वैजनाथ खडसे, विजय वासेकर, अनुप गिरी, अमित वल्लपकर, लता पाटणकर, ताई सिंग, ताई लभाने आणि विद्यार्थी उपस्थित होते.