मांगली अपघात: अपघातग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

मदतीसाठी आठ तास उचलले नाही प्रेत

0

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील मांगली जवळ दहा डिसेंबर रविवारी सकाळी दहा वाजता ट्रक क्रमांक MH 29 T 1551 व मोटर सायकल क्रमांक MH 29 Z 4459 चा अपघात झाला. यात खुशाली दिनकर निखार चा मृत्यू जागीच  झाला तर दिनकर निखार व मुलगी भावीका हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांनी आर्थीक मदतीसाठी संध्याकाळ पर्यंत आठ तास प्रेत उचलले नाही. पण कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. दिनकर निखार ह्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असुन कुटुंबावर आर्थिक संकट उभे आहे व ते मदतीची अपेक्षा करीत आहे.

मांगली शिवारात नेर येथील सव्वालाखे यांनी रेतीचे घाट हर्रास मध्ये घेतले आहे. महसुल विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता घाटावर वाहनांना आगमन करण्यासाठी रस्ता दुरुस्तीचे काम चालु होते. मांगली येथील रहिवाशी दिनकर निखार हे त्यांच्या शेतात कापुस वेचण्यासाठी दोन मुली खुशीला व भाविका यांच्या सोबत मोटार सायकलने जात होते. त्यावेळी ट्रक चालक आपले वाहन मागे घेत असताना  दिनकर  निखार आणि त्यांच्या दोन मुली ट्रकच्या मागे दबले गेले. यात दिनकर यांची मुलगी खुशी मागच्या चाकात आल्याने जागेवरच मरण पावल.

दिनकर व मुलीला  वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी जोपर्यंत ठेकेदार सव्वालाखे मदत जाहीर करत नाही, तोपर्यंत मृत शरीर त्या जागेवरुन उचलनार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे तणाव युक्त वातावरण निर्माण झाले. मुकूटबन येथील ठाणेदार गुलाबराव वाघ रजेवर गेल्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे पाटण, वणी, मारेगांव, शिरपुर, व पांढरकवडा येथील बंदोबस्त घेऊन आले.  मोबाइल वरुन ट्रक मालकाच्या मोबाईल वर संपर्क केला पण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आले नाही. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व तहसीलदार गणेश राऊत यानी सामोपचाराने प्रेत उचलण्यास सांगितले त्यानंतर पंचनामा करुन सोमवारी अंतिम संस्कार करण्यात आले.

दिनकर व त्यांची मुलगी भावीका यांच्यावर वणी येथील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. हेडाऊ यांच्याकडे उपचार करण्यात आला. त्यासाठी १५ ते २० हजार रुपये खर्च आला. पन दिनकर निखार यांच्या कमरेत त्रास वाढुन लघवी बंद झाली. त्यामुळे त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात तपासणी करिता नेण्यात आले. तर तिथे त्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येइल असे सांगितले.

दिनकर यांना चार मुली असुन त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे ते शस्त्रक्रिया सुध्दा करु शकत नाही. सध्या त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा आहे. अशाप्रसंगी त्यांना मदत कोण करेल हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.