कोण आहेत जय सहकार पॅनलचे उमेदवार ?

जाणून घ्या प्रत्येक उमेदवारांचे कार्य आणि कर्तुत्व

जितेंद्र कोठारी, वणी: रविवारी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी वसंत जिनिंग म्हणजेच दी वसंत को. ऑप. शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमी. वणी (र. नं. 106) या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत चार पॅनल रिंगणात आहे. यातील एक माजी आमदार वामनराव कासावार यांचे आहे. दुसरे पॅनल विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे आहे. तिसरे पॅनल संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना व कम्युनिस्ट पक्षाच्या युतीचे आहे. या तिन्ही पॅनलची लढत विद्यमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात लढल्या जाणा-या ‘जय सहकार’ पॅनलशी आहे. जय सहकार पॅनलचे निवडणूक बोध चिन्ह – ☂ छत्री आहे.

कोण आहेत जय सहकार पॅनलचे उमेदवार ?
सर्वसाधारण मतदार संघ
काळे देविदास पांडुरंग – हे अध्यक्ष रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था, वसंत जिनिंग अध्यक्ष आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण व समाजकारणात आहेत. सहकार क्षेत्रातील मातब्बर म्हणून त्यांची ओळख आहे.

चोरडिया विजय पारसमल- वणी
विजय चोरडिया हे परिसरातील एक सुप्रसिद्ध उद्योजक व व्यावसायिक आहेत. मात्र त्यापेक्षा अधिक परिसरात त्यांची एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम राबवले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करीत असून हजारो रुग्णांचे मोठ्या रुग्णालयात त्यांच्या मदतीने उपचार केले गेले आहेत.

एकरे पवन शामराव- मेंढोली येथील रहिवासी आहेत. ते कृ.उ.बा.स. वणीचे उपसभापती आहे.
खुराणा प्रेमकुमार रामस्वरुप – हे कुंभा येथील रहिवाशी आहेत. ते माजी सरपंच होते. परिसरात त्यांची एक मितभाषी, मनमिळाऊ, स्वच्छ प्रतिमा असलेले व्यक्ती म्हणून ओळख आहे.
गोहोकार प्रशांत विजयराव – वणी
हे वणी येथील रहिवासी असून ते वसंत जिनिंगचे माजी उपाध्यक्ष आहेत.

जोगी मोहन चिंतामण – मार्डी येथील रहिवासी असून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत.
ठाकरे अमोल मारोती- येडत (झरिजामणी) येथील रहिवासी आहे. एक शेतकरी व समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे.
पाथ्रडकर हरिहर उर्फ राजाभाऊ गोविंदराव- हे वणी येथील रहिवासी असून त्यांची परिसरात एक कलाप्रेमी, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कायम वावर असलेली व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. शहरातील लॉइन्स संस्थेचे ते माजी अध्यक्ष, संचालक

पारखी संजय तुळशीराम- हे मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील रहिवासी आहे. त्यांची परिसरात एक समाजसेवक म्हणून ओळख आहे.
बोबडे लुकेश्वर वामन – हे शिंदोला येथील रहिवासी आहे. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावर आहे.
भोंगळे पुंडलिक गजानन – ते वणी येथील रहिवासी असून त्यांनी खरेदीविक्री संस्थेचे संचालक पदही भूषवले आहे.

मांडवकर विलास आबाराव – पठारपूर येथील रहिवासी असलेले विलास मांडवकर हे इंदिरा सहकारी सूतिरणीचे संचालक आहे.

अनुसूचित जाती जमाती मतदार संघ
सुरपाम नामदेव वारलुजी – घोंसा
वणी पंचायत समितीचे माजी सदस्य
इतर मागासवर्गीय मतदार संघ
वरारकर सुनील बालाजीपंत – भालर
वणी पंचायत समितीचे माजी सभापती

भटक्या विमुक्त जाती/जमाती मतदार संघ
बरडे सुरेश तानाबाजी _ वणी रंगनाथ सवामी पतसंस्थेचे संचालक
महिला राखीव मतदार संघ
पाचभाई सौ. मंदा धनंजय
भोंगळे वंदना विकास – मारेगाव (कोरंबी) चे दिवंगत सरपंच विकास भोंगळे यांच्या त्या पत्नी आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.