वसंत जिनिंगसाठी आज मतदान… कोण मारणार बाजी?

आजी माजी आमदारांचे ऍड. काळे यांना आव्हान... असे आहेत मतदान केंद्र...

जितेंद्र कोठारी, वणी: आज रविवारी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी वसंत जिनिंग म्हणजेच दी वसंत को. ऑप. शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमी. वणी (र. नं. 106) या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळासाठी मतदान होणार आहे. आज 10934 मतदार 63 उमेदवारांचा फैसला करणार आहेत. वणी उपविभागातील 14 मतदार केंद्रावरील 24 मतदान केंद्रावर मतदारांना मतदान करता येणार आहे. आजी माजी आमदारांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. सोबतच या निवडणुकीत रंगत देखील वाढली आहे.

असे आहेत मतदान केंद्र –
वणीमध्ये शाळा क्रमांक 3 येथे वणी शहरातील मतदारांना मतदान करता येणार आहे. या मतदान केंद्रावर 1218 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. तर एसपीएम विद्यालयात वणी ग्रामीण भागातील मतदारांना मतदान करता येणार आहे. या ठिकाणी 1553 मतदार आपला हक्क बजावणार आहे.

नांदेपेरा 306, उकणी 701, शिरपूर 395, शिंदोला 348, वेळाबाई 449, कायर 508, कायर 427, मुकूटबन 358, मुकूटबन 540, पाटण 427, पाटण 645, घोंसा 418, रासा 588, मारेगाव 432, मारेगाव 308, मार्डी 409, मार्डी 387, कुंभा 417 असे एकूण 10934 मतदार मतदान करणार आहेत.

बुथ प्रमुख निभावणार महत्त्वाची भूमिका
या निवडणुकीचे मतदार विविध भागात विखूरलेले आहेत. वणी उपविभागासह अनेक मतदार इतर ठिकाणी स्थायिक झाले आहे. त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करणे व त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी बुथ प्रमुखांवर राहणार आहे. जे बुथ प्रमुख मतदारांना मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरणार, त्यांचे पारडे जड मानले जाणार आहे. आज मतदानाच्या दिवशी सर्व पॅनलचे मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचवण्यावर भर राहणार आहे.

कोण मारणार बाजी?
या निवडणुकीत चार पॅनल रिंगणात आहे. यातील एक माजी आमदार वामनराव कासावार यांचे आहे. वामनराव कासावार यांनी पॅनल उभे केल्याने काँग्रेसमध्येच 2 गट पडलेले आहेत. दुसरे पॅनल विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे आहे. विद्यमान आमदारांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने या निवड़णुकीची रंगत आणखी वाढली आहे. तिसरे पॅनल संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना व कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आहे. काँ. अनिल हेपट यांच्या नेतृत्त्वात हे पॅनल लढत आहेत.

या तिन्ही पॅनलची लढत विद्यमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात लढल्या जाणा-या ‘जय सहकार’ पॅनल विरोधात आहे. जय सहकार पॅनल ☂ छत्री हे बोधचिन्ह घेऊन निवडणुकीत उतरले आहे. आजी माजी आमदार शर्यतीत असले तरी परिसरातील सहकार क्षेत्रात ऍड देविदास काळे यांचा दबदबा गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. सहकार क्षेत्रावर असलेली पकड, अनुभव तसेच गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी वसंतवर रोवलेला झेंडा याशिवाय रंगनाथ स्वामी बँकेवर असलेल्या त्यांचे वर्चस्व यामुळे विरोधकांना ही निवडणूक चांगलीच जड जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी जय सहकार पॅनलला संजय देरकर व विजय चोरडिया यांची साथ लाभल्याने जय सहकार पॅनलला चांगलीच बळकटी आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.