रफीक कनोजे, झरी: मुकुटबन येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून चितळ ची शिकार करणाऱ्या इसमास पकडून कार्यवाही केली. मुकुटबन येथील इसमाने शेतात फासे टाकून चितळाची शिकार केल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संबंधित इसमाला अवजार व चितळाच्या मांसा सह ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
माहिती नुसार मुकुटबन येथील शिवराम मांढरे (42) हा व्यक्ती आपल्या शेताजवळ फासे टाकून (जंगली प्राणी) चितळाची शिकार करून मांस घरी आणल्याची गुप्त माहिती वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वारे यांना मिळाली. यावरून वारे यांनी आपले कर्मचारी मांढरे यांच्या घरी पाठविले. तेथे पोत्यात ८ ते १० किलो चितळाचे मांस व कापण्यासाठी वापरलेले अवजारे आढळून आले. मांस, अवजारे जप्त करून मांढरे याला अटक केली.
जप्त केलेले मांस पंचनामा करून वनविभागाच्या आवारात पुरण्यात आले असून आरोपी विरुद्ध भारतीय अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ड अ वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४९,५९,अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वारे सह क्षेत्रसहायक ए.जी.कुरोडे वनरक्षक डी.डी. पाचभाई पी.यु भोसले ए.स कुडमेथे वनपाल व्हि. एच. शिंदे, वनमजूर पी.व्ही लेडांगे, डी.स कोटरंगे व इतर कर्मचार्यांनी केली.