प्रवीण खानझोडे: मजुरी ते व्यावसायिक… एका कार्यकर्त्याचा थक्क करणारा प्रवास…
जाती धर्मापलीकडे जाऊन माणसातील माणूस शोधणा-या कार्यकर्त्याचा आज वाढदिवस
निकेश जिलठे, वणी: जाती, धर्म बाजुला सारून केवळ माणसात माणूस बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके आहेत. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे. मात्र फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची कास धरून आज सामाजिक, राजकीय व व्यवसायात यशस्वी वाटचाल करणारी व्यक्ती म्हणजे प्रवीण खानझोडे. तसं त्यांचं प्रोफेशनल वर्क रिलायन्स निप्पोन लाईफ BDM मध्ये आहे. पण त्यांची विशेष ओळख राजकारणापलीकडे पाहणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच आहे.
कायम ऍक्टिव्ह राहणं, प्रामाणिकता, समाजाशी असलेली त्यांची बांधीलकी बघता विविध सामाजिक संघटनेचे पद त्यांच्याकडे आपसुकच चालून येतात. हा सर्व डोलारा सुरळीत सुरू असताना त्यांनी अलिकडेच सुरू झालेली केलेली एक व्यावसायिक म्हणूनही वाटचाल यशस्वी ठरली आहे. आज बारा बलुतेदार यांच्या न्याय व हक्कासाठी ते लढा देत आहे. ते सध्या बारा बलुतेदार कृती समितीचे कार्याध्यक्ष म्हणून काम करीत आहे. अशा या होतकरू, प्रामाणिक, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारे, विविध संघटनांवर मोठ्या पदावर असतानाही पाय जमिनीवर ठेवत केवळ एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जगणा-या व उतरांनाही प्रेरणा देणारे युवा व्यक्तीमत्व प्रवीण खानझोडे यांचा आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त वाचकांसाठी खास व्यक्तीचित्र…
प्रवीण खानझोडे यांचा अल्प परिचय…
आज जरी सुटबुटात प्रवीण खानझोडे दिसत असले तरी त्यांचा हा प्रवास अत्यंत खडतड व थक्क करणारा आहे. वडिलांची अचानक नोकरी जाणे, सर्व जबाबदारी खांद्यावर येणे. त्यातून शालेय जीवनातच मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावणे ते एक खासगी कंपनीत उच्च पदावरचे अधिकारी बनून आपल्यासारख्याच इतरांना रोजगार देण्याचा त्यांचा हा प्रवास एका चित्रपटाच्या कहाणीला शोभावा असाच आहे.
प्रवीण यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1978 चा. सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचं मुळ गाव मारेगाव रोडवरील गौराळा. वडील wcl मध्ये नोकरीला. वडीलांची राजूर येथे नोकरी असल्याने 1979 मध्ये ते संपूर्ण परिवारासह राजूर येथे स्थलांतर झाले. प्रवीण यांचं सहावी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. तर दहावी पर्यंतचं शिक्षण राष्ट्रीय विद्यालय राजूर इथे झालं.
प्रवीण सहावीत असताना एक मोठी घटना त्यांच्या आयुष्यात घडली. त्यांच्या वडीलांनी अचानक नोकरी सोडली. त्यामुळे घरीचं आर्थिक गणित बिघडलं. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी त्यांनीही हातभार लावायचं ठरवलं. 14 व्या वर्षां पासून मिळेल ते काम करायचं त्यांनी ठरवलं. मात्र हे सर्व करताना शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये याची पूर्ण काळजी त्यांनी घेतली. त्यातच त्यांचा संपर्क आंबेडकरी चळवळीतील काही मित्रांशी आला. या मित्रांच्या विशेष सहकार्यानेच त्यांना वेळोवेळी शिक्षणात मदत झाली. तेव्हापासून ते आंबेडकरी चळवळीशी जुळले. आज आंबेडकरी चळवळीसोबतच विविध सामाजिक चळवळीचे ते ऍक्टिव्हली भाग आहेत.
शाळेत असताना ते राजूर येथील किराणा दुकानात सकाळी व सायंकाळी काम करायचं व दिवसा अभ्यास कारायचा अशी त्यांची दिनचर्या होती. दहावी नंतर त्यांनी वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे बीए पर्यंत त्यांनी तिथंच शिक्षण घेतलं. कॉलेजला असतानाच आंबेडकरी विचारधारेने प्रभावित होऊन त्यांनी फुले-शाहू- आंबेडकरी चळवळीची कास धरली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा प्रवास सुरू आहे.
थोडक्यात कार्य…
सुरवातीला ते विद्यार्थी चळवळीशी जुळलेले होते. तिथूनच त्यांनी राजकीय चळवळीतही जाण्याचा निश्चय केला. मात्र समाजकारण याकडे त्यांचा विशेष ओढा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजकारणाबाबत म्हणतात की जर राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी सामाजिक प्रश्नांचा पाया मजबूत असणे गरजेचे आहे. हाच आदर्श घेऊन ते आज शोषित, वंचित, बारा बलुतेदार, ओबीसी इत्यादींच्या चळवळीत सातत्याने भाग घेत आहेत. आजच्या ओबीसी समाजात जनजागृती करण्याची नितांत गरज आहे. ओबीसींना असलेले हक्काची जाणीव आजही या समाजाला नाही त्यामुळे त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी त्यांनी ओबीसी परिषदेचे गठन केले. ओबीसी परिषदेच्या माध्यमातून ते जनजागृतीचे कार्य करतात.
बलुतेदार म्हणजे एकप्रकारे गावकामगारच. पिढ्यानपिढ्या ठराविक पारंपरिक काम करणारे हे 12 बलुतेदार आज जरी विविध क्षेत्रात असले, तरीही ही संख्या मोजकी आहे. त्यांना न्याय व हक्कासाठी आजही लढावं लागतं. या समाजाच्या उत्थानासाठी, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, औद्योगिक विकासासाठी प्रवीण खानझोडे सध्या बारा बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून कार्य करीत आहे. सध्या वणी विधानसभा क्षेत्रातील गावपातळीवर बारा बलुतेदारांना संघटीत करण्याचे काम जोमात सुरू आहे.
त्यांचा व्यवसाय हा इंशोरंस सेक्टर मधला आहे. गेल्या 10 वर्षांपासून ते रिलायन्स निप्पोन लाईफ BDM मध्ये काम करतात. मात्र व्यवसाय करतानाही त्यांचे सामाजिक कार्य सुरूच आहे. या माध्यमातून त्यांनी वणी परिसरातील अनेक होतकरू लोकांना आर्थिक मदत केली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एक व्यावसाय क्षेत्रातही सुरुवात केली. उर्वी एंटरप्राईजेस या प्रतिष्ठाणाच्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय क्षेत्रातही पाऊल ठेवले.
चळवळीतील कार्यकर्ता हा सामाजिक क्षेत्रात काम करताना स्वत:च्या घराकडे दुर्लक्ष करताना दिसतो. मात्र आधी स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडून त्यानंतर तितक्याच जोमाने सामाजिक क्षेत्रातही कार्य करता येऊ शकते याचे प्रेरणादायी उदाहऱण म्हणजे प्रवीण खानझोडे. आज जरी प्रवीण खानझोडे म्हटलं की त्यांची ओळख द्यावी लागत नाही. तरुणांसमोर एक आदर्श कार्यकर्ता म्हणून असणारे प्रवीण व्यवसायात मात्र एक टीम लिडर म्हणून नेतृत्व करतात. त्यांना व्यवसाय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…
Comments are closed.