अन… त्याने केले अनाथ पोरीला जीवनसाथी..!

0
वणी(रवि ढुमणे): सध्या उपवर मुलामुलींचे लग्न जमविणे सोबतच जमलेले लग्न उरकण्याचा सपाटा सुरू आहे.  यातच समाजाच्या रूढी परंपरेला तडा देत एका तरुणाने अनाथ असलेल्या मुलीसोबत लग्न करून  जीवनाचा आधार दिला आहे.
लग्न जमवायचं म्हटलं की, मुलाकडे संपत्ती किती आहे.  कुठे नोकरी करतोय, तर दुसरीकडे मुलगी कशी आहे.  तीच कुटुंब कस, वागणूक कशी,दिसायला सुंदर आहे का? इतकेच नव्हे तर हुंड्यात काय काय मिळेल?  असे अनेक प्रश्न विचारले जातात किंवा उपस्थित होतात. लग्न करायचे म्हटले की,लावला बाजार, मग माध्यस्थीची भूमिका महत्वाची.  पोरीचा बाप मुलाकडे संपत्ती किती? तो नोकरीवर आहे.  मग त्याला 10 ते 20 लाखाचे पॅकेज द्यायला हरकत नाही.  असे म्हणून लग्नाला होकार देतो.  लग्नाची वेळ येते आणि मुलीकडून मिळालेल्या पॅकेजच्या पैशाने मुलाची वरात”डीजे लावून निघते”  मुहूर्ताची वेळ केवळ पत्रिकेत पण दोस्ताना खुश। करावं लागतं अन ते बी सासऱ्याचा पैशावर…
आजही समाजात असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.  ज्याच्याकडे संपत्ती आहे.  तोच मागतो आहे. आणि मुलगी सुखात राहावी म्हणून बाप सुद्धा देतो आहे. या रूढी परंपरेला फाटा देत समर्थवाडी यवतमाळ येथील अतुल पुंडलीकराव किनकर या तरुणाने अनाथ मुलीला जीवनसाथी करण्याचे धाडस करीत वणी येथील आंनद बालसदन मधील सोनू या अनाथ मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
27 जानेवारीला 11  वाजून 47 मिनिटांनी वरोरा मार्गावरील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात अतुल व सोनू चा विवाह सोहळा पार पडणार आहे. हा लग्न सोहळा आनंद बालसदन परिवाराने आयोजित केला आहे.
अतुल किनकर या तरुणाने अनाथ पोरीला जीवनसाथी करण्याचे धाडस दाखवून समाजाला एक
आदर्श संदेश दिला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.