जागृत पत्रकार संघाद्वारे पोलीस भरती सराव परीक्षा

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त आयोजन

विवेक तोटेवार, वणी: 6 जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकारदिन म्हणून साजरी करण्यात येते. पत्रकारदिनाचे औचित्य साधून तसेच पोलीस भरती परीक्षा जवळच असल्याने जागृत पत्रकार संघाद्वारे पोलीस भरती सराव परीक्षा लोकमान्य टिळक महाविद्यालयात रविवार 1 जानेवारीला सकाळी 10.15 वाजता घेण्यात आली. या सराव परीक्षेत वणी विभागातून 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, परंतु पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाल्याने 370 विध्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.

Podar School 2025

ही सराव परीक्षा पूर्णपणे निःशुल्क होती. या परीक्षेत प्रथम, द्वितीय, तुतीय व चतुर्थ अशी विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळी पारितोषिके ठेवण्यात आली आहे. ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक वैभव ठाकरे, युवा चेतना क्लबचे प्रा, दिलीप मालेकर यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. परीक्षा केंद्राला वणीचे ठाणेदार प्रदीप शिरस्कर व सपोनि माया चाटसे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तसेच आशीष खरवडे,दीपक मोहितकर, राहुल सूर्यवंशी, सुमित पदलमवार, पंकज मोहरे, रुपेश लक्षेट्टीवार, सागर जाधव, जगदीश भगत, प्रफुल भगत, सागर बोधले, अमित काळे, राहुल झाडे, राकेश पोटे आदी शिक्षकानी सहकार्य केले.

सदर कार्यक्रमाला जागृत पत्रकर संघ शाखा वणी कार्यकारणीचे विदर्भ अध्यक्ष – राजू धावंजेवार, तालुका अध्यक्ष – संदीप बेसरकर, सचिव – मो. मुश्ताक, उपाध्यक्ष – विवेक तोटेवार, सहसचिव – प्रशांत चंदनखेडे, कोषाध्यक्ष – पुरुषोत्तम नवघरे, सदस्य -गणेश रांगणकर, श्रीकांत किटकुले, मनोज नवले, प्रवीण नैताम, आकाश डुबे, राहुल आहुजा, कायदेविषयक सल्लागार ऍड अमोल टोंगे आदींनी सहकार्य केले.

Comments are closed.