काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी (अजा.) दर्शना पाटील यांची नियुक्ती

सामाजिक कार्याची दखल घेत वरिष्ठांनी दिली जबाबदारी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: शहरातील सामाजिक क्षेत्रात नेहमी वावर असलेल्या व काँग्रेसच्या कार्यकर्त्या दर्शना पाटील यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रातील कार्यबाबत व जनसामान्यांच्या न्याय मिळवून देण्याची त्यांची धडपड लक्षात घेऊन यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष (अजा) महेंद्र कावळे यांनी ही निवड केली आहे. अनुसुचित जातीचे विविध प्रश्न सोडवण्यास यापुढेही प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया दर्शना पाटील यांनी दिली. त्यांच्या या नियुक्तीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

Podar School 2025

Comments are closed.