विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथील एका 33 वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अजय जगन केवट (33) असे मृतकाचे नाव असून तो मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी होता. तो वाहन चालक म्हणून काम करायचा. कामानिमित्त तो राजूर येथे पत्नीसह राहायचा. बुधवारी दुपारच्या सुमारास त्याने घरी कुणी नसताना संधी साधून पत्नीच्या साडीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या पत्नीला ही बाब कळताच तिने याची माहिती नातेवाईक व पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Podar School 2025

Comments are closed.