युवराज ताजने (मेंढोली): “परिसंस्थेत विविध प्रकारचे जीवाणू, प्राणी आणि वनस्पती असतात. परिसंस्थेतील जैविक घटकांत एक प्रकारची सुसूत्रता असते. निसर्ग नियमानुसार सर्वांच्या एकमेकांत आंतरक्रिया चालू असतात. मात्र निसर्गात घडणाऱ्या नेहमीच्या गोष्टी व्यतिरिक्त नवीन काही घडलं की, ती बाब चर्चेचा, कुतुहलाचा विषय होतो. काहीशी अशाच प्रकारची ही बाब.”
वणी तालुक्यातील मेंढोली येथील शेतकरी सारंग पंढरीनाथ डवरे यांच्या मालकीच्या गायीने जुळ्या वासरांना बुधवारला जन्म दिला. सदर गाय ही जर्सी जातीची आहे. गायीचे वय चार वर्ष असून मध्यम बांधा आहे. दोन्ही वासर कालवड असून गायीचे हे दुसरे वेत आहे. आश्चर्य म्हणजे दोन्ही वासरांची हंबरण्याची आणि शौचविधी क्रिया एकसारखीच आहे. दुर्मिळातील दुर्मिळ असा हा प्रकार आहे.
त्यामुळे गावशिवारात सदर बाबीची चर्चा रंगत आहे. सारंग डवरे हे प्रगतिशील शेतकरी असून त्यांनी सदर गाय दीड वर्षापूर्वी खरेदी केली आहे. गायीला जुळे झाल्यामुळे निश्चितच डवरे कुटुंबियाचा आनंद द्विगुणित झाला आहे.