वणी लायन्स वरिष्ठ महाविद्यालयात आता B.Sc. व B.com साठी प्रवेश सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: येथील वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, ला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा अंतर्गत बी.एस.सी व बी.कॉम (इंग्रजी माध्यमाच्या) अभ्यासकमाला मागील सत्रात (२०२२ – २०२३) मान्यता मिळाल्यामुळे पदवीचे वर्ग सुरू करण्यात आले. तसेच चालू शैक्षणीक सत्रात (२०२३-२०२४) बी.एस.सी. (प्रथम व व्दितीय वर्ष) व बी. कॉम प्रथम वर्ष (इंग्रजी माध्यम) अभ्यासक्रमासाठी सरळ प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. मर्यादीत जागा असल्यामुळे विदयार्थ्यानी व पालकांनी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन शाळा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

उपलब्ध विषय –
B.Sc. (Part -1-2)
फिजिक्स, मॅथ, कॉम्प्युटर सायंस
फिजिक्स, मॅथ, केमिस्ट्री
बॉटनी, झुलॉजी, केमिस्ट्री
B.Com (1) – इंग्रजी माध्यम

काय आहे प्रवेश प्रक्रिया?
प्रवेशा करीता विदयार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रीका, आधारकार्डची झेरॉक्स प्रत व स्थनांतरण प्रमाणपत्र (T.C.) ची मुळ प्रत प्रवेश अर्जासह संस्थेच्या देशमुखवाडीतील मुख्य कार्यालयात सकाळी १०:३० ते दुपारी २:३० वाजता दरम्यान जमा करावी लागणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सामाजीक व शैक्षणीक उपक्रमा अंतर्गत वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट नोंदणी क्र.E / 172 जि. यवतमाळ व्दारा कमी शैक्षणीक शुल्क आकारून शहरात इंग्रजी माध्यमाची शाळा १९७५-१९७६ सत्रांत सुरू करण्यात आली. देशमुखवाडी येथे थोडया जागेत सुरू केलेल्या शाळेचा आता चांगलाच विस्तार झाला असून, शाळेच्या देशमुखवाडी, रवी नगर परिसरात व नांदेपेरा मार्गावर शैक्षणीक दृष्टया सुसज्ज व प्रशस्त ईमारती आहेत. यातून नर्सरी ते १२ वी विज्ञान तसेच पदवीचे शिक्षण दिल्याजाते. तसेच संस्थेव्दारा अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

या पूर्वी वणी परिसरात पदवीचे शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांना मर्यादीत जागा असल्यामूळे अडचणी येत होत्या व अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचीत रहात होते त्यामुळे वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टने विद्यार्थ्यासाठी संधी उपलब्ध करून दिली या संधीचा लाभ विदयार्थी व पालकांनी घ्यावा असे आवाहन संस्थेने केले आहे

अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क –
कार्यालय, लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल, देशमुखवाडी, वणी
1) 9049851616 2) 9881755887 3) 8999681525

Comments are closed.