प्रभारी कृषी अधिकाऱ्याला सरपंचाकडून मारहाण

सरपंचाविरुद्ध कृषी संघटना आक्रमक

0

रफीक कनोजे, झरी: झरी येथील पंचायत समितीचे कृषी अधिकाऱ्याला कृषी केंद्र चालकाचे पुत्र तसेच मांगलीचे सरपंच यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवार ५ जानेवारी रोजी झरी येथे घडली. त्यानंतर पंचायत समितीचे गट विकास अधिका-यांसह काही इतर स्थानिक नेत्यांनी दोघांची समजूत काढली. त्यामुळे दोघांनी एकमेकाची माफी मागून वाद संपुष्टात आणला. मात्र सदर घटना पैशाच्या देवाण घेवाण वरून घडली असल्याची चर्चा दिवस भर कृषी दुकानदारांमध्ये होती.

प्राप्त माहितीनुसार मांगली गावाचे सरपंच नितीन गजानन गोरे यांचे झरी येथे हार्डवेअरचे दुकान आहे. दुकानाला लागुन त्यांचे वडील गजानन गोरे यांचे तिरुपती कृषी केंद आहे. झरी येथील पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश नीलगीरवार हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा प्रभार वणी येथील कृषी अधिकारी गणेश यादव यांचेकडे देण्यात आला. शुक्रवारी झरी पं.स. चे प्रभारी कृषी अधिकारी गणेश यादव हे तिरुपती कृषी केंद्रात प्रिन्सिपल अमेडमेंट परवाना मिळाला कि नाही याची तपासणी करीता गेले. तिथे नितिन गोरे सोबत त्यांचा वाद झाला. त्यावरुन नितीन गोरे यांनी कृषी अधिकारी यादव यांना धक्काबुकी करून मारहाण केली.

कृषी अधिकारी यादव यांनी वरीष्ठशी चर्चा करून मारहाण करण्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये नोंदविण्याची तयारी सुरू केली. तर दुसरी कडे कृषी केंद्र चालकांनी सुद्दा अपशब्द बोलणे व लाच मागितल्याची पोलिसांत तक्रार करण्याच्या हालचाली सुरू केल्या. याची माहिती मिळताच गट विकास अधिकारी व काही पदाधिका-यांनी गणेश यादव व नितीन गोरे यांना आपल्या कक्षात बोलावून दोघांची समजूत काढली. त्यावरून दोघांनी एकमेकाची माफी मागून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार न करता वाद संपुष्टात आणला.

भरचौकात जनतेसमोर शासकीय कृषी अधीका-याला मारणे योग्य आहे का असा प्रश्न कृषी संघटनेच्या वतीने उपस्थित केल्या जात आहे. मारहाण करणाऱ्या सरपंचाविरुद्ध कृषी संघटना आक्रमक पवीत्र्यात दिसुन येत आहे. कृषी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतल्यास हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासंदर्भात मारहाण करणा-या सरपंचाशी वणी बहुगुणीने बातचित केली असता ते म्हणाले की….

प्रभारी कृषी अधिकारी गणेश यादव १० दिवसापासून पैशाची मागणी करीत होते. खालच्या पातळीचे शब्द वापरल्यामुळे रागाच्या भरात हात उगारले. तालुक्यातील अनेक कृषी दुकानदाराकडुन पैसे वसुलही केले. :- सरपंच ग्रा. पं. मांगली, नितीन गोरे.

यासंदर्भात प्रभारी कृषी अधिकारी यांनी वणी बहुगुणीला प्रतिक्रिया दिली आहे.

प्रिन्सिपल अमेडमेंट परवाना मिळाला की नाही याची तपासणी करिता कृषी केंद्रात गेलो असता नितीन गोरे यांनी धक्काबुक्की करून मारहाण केली. मी पैश्याची मागणी केली नाही. – प्रभारी कृषी अधिकारी झरी, गणेश यादव.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.