ग्राम पंचायत कामगार सेनेच्या अध्यक्षपदी राम वालकोंडे तर संदीप शेंडे सचिवपदी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेनेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी मारेगाव येथील राम वालकोंडावार यांची नियुक्ती करण्यात आली. तर सचिव म्हणून नांदेपेरा येथील संदीप तातोबा शेंडे, उपाध्यक्ष म्हणून महादेव बापुराव पानघाटे तर सल्लागार म्हणून ऍड दिलिप परचाके यांची निवड करण्यात आली. शनिवारी दिनांक 17 जून रोजी पंचायत समिती सभागृह वणी येथे एक बैठक पार पडली. या बैठकीत ग्राम पंचायत कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विलास यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. नवीन पदाधिका-यांच्या नियुक्ती बाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.