शुल्लक वादातून ऑटोचालकाला व त्याच्या मित्राला काठीने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: ऑटो चालकाने बाजूला हो म्हणत धक्का दिल्याच्या रागातून दोघांनी ऑटोचालक व त्याच्या मित्राला काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. रविवारी 16 जुलै रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास पटवारी कॉलोनी परिसरात ही घटना घडली. मारहाण करणारे दोन्ही आरोपी हे रंगनाथ नगर येथील असून त्यांच्या वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी शाहीद रफिक शेख (34) रा. पटवारी कॉलोनी लालगुडा येथील रहिवासी असून तो ऑटो चालवतो. रविवारी दिनांक 16 जुलै रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास शाहीद ऑटो घेऊन घरी जात होता. पटवारी कॉलोनीच्या रस्त्याने चिखल असल्याने जाताना त्याचा ऑटो स्लिप होत होता. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला आरोपी सिद्धार्थ (21) रा. रंगनाथ नगर हा होता. ऑटो स्लिप होत असल्याने शाहीदने सिद्धार्थला धक्का देऊन दूर व्हायला सांगितले व तो ऑटोने घरी निघून गेला. मात्र धक्का दिल्याचा राग सिद्धार्थच्या मनात होता.

घरी गेल्यावर शाहीदने त्याचा मित्र अमोल वाबिटकर याला घरी जेवणासाठी बोलावले. मात्र रस्त्याने येताना चिखल असल्याने त्याच्या दुचाकीच्या मडगार्डमध्ये चिखल जाऊन दुचाकीचे चाक जॅम झाले. त्यामुळे त्याने शाहीदला फोन करून बोलावले. तो तिथे गेला असता तिथे सिद्धार्थ व साहील झाडे (25) रा. रंगनाथ नगर वणी हे लाकडी दांडा घेऊन आले व त्यांनी ऑटोवाला कुठे आहे? अशी विचारणा करत अमोलला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान शाहीदने मीच ऑटोवाला आहे असे सांगताच दोन्ही आरोपींनी अमोल व शाहीदला काठीने मारहाण केली. या मारहाणीत दोघांच्याही डोक्यावर जबर ईजा होऊन दोघेही जखमी झाले. शाहीदने हायवेवर येऊन मदतीसाठी याचना करीत असताना तिथे अमोलचे भाऊ प्रमोद वाबीटकर भेटले. त्यांनी झालेला प्रकार सांगून त्यांनी तात्काळ वणी पोलीस स्टेशन गाठले.

शाहीदवर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले तर अमोल गंभीर ईजा असल्याने त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी गेला. पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ व आरोपी साहील या दोघांविरोधात भादंविच्या कलम 324, 427, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोह विठ्ठल बुरेवार करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.