पाटण येथे शेतकऱ्याच्या घराला आग

४० क्विंटल कापूस, पैसे आणि घरातील सामान खाक

0

रफीक कनोजे, झरी: तालुक्यातील पाटण येथील शेतकरी विलास राजरेड्डी कोकटवार यांच्या घराला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. प्राप्त महितीनुसार ९ जानेवारी ला गाढ झोपेत असताना रात्री २ ते २.३० वा दरम्यान शॉर्टसर्किट मुळे घराला आग लागली. पाहता-पाहता आगीने रुद्ररूप धारण केले. यात घरातील १८ क्विंटल कापूस, नगदी १८ हजार रुपये, सागवान फाटे, दरवाजे खिडक्या, ताटे, आलमारी, गाद्या पांघरून, वीजमीटर वायर व महत्वाची कागदपत्र जळून खाक झाले. आग लागलेल्या घराच्या बाजूला राहणारे भुमन्ना मॅनरवार यांच्याही घराचे सुध्दा आगीत नुकसान झाले आहे.

या आगीत शेतकरी विलास कोकटवार यांचे ४ लाख ७७ हजाराचे नुकसान झाले. जिवीत हानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रात्री आग लागल्याची माहिती मिळताच गावातील तरुण युवक मुकेश जयस्वाल, श्रीकांत मॅकलवार, प्रवीण मॅकलवार, दिनेश कोटवार, यांच्यासह गावातील युवकांनी गावातीलच बोनगिरवार चे पाण्याचे टँकर आणुन गावातील तरुणांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

पांढरकवडा येथून अग्निशमन दलाला पाचारण केले तरी सुद्धा शेतकर्याचे मोठे नुकसान झाले.घटनास्थळी ठाणेदार शिवाजी लष्करे , सरपंच रमेश हललवार , सामाजिक कार्यकर्ते रामलु आईटवार, तहसीलदार गणेश राऊत, मंडळ अधिकारी झरी महेंद्र देशपांडे, तलाठी दुर्भा बालकृष्ण येरमे व तलाठी पाटण संदीप शेळके यांनी भेट देवून पंचनामा केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.