शाळा क्र. 7 चे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

वणी बहुगुणी डेस्क : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती वर्ग 5 ची परीक्षा फेब्रुवारी 2023 मध्ये पार पडली. या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच लागला असून यात नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. 7 चे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. अनुज विजय चव्हाण व अदिती अमोल झाडे असे यशस्वी विद्यार्थ्यांचे नाव आहे. 

वणी नगर परिषद अतंर्गत शाळा क्र. 7 ही शैक्षणिक व शालेय उपक्रमांसाठी शहरात प्रगत शाळा म्हणून ओळखल्या जाते. या शाळेतून शिक्षण घेऊन गेलेले विद्यार्थी आज शैक्षणिक क्षेत्रात अतिशय पुढे आहेत. याच श्रृंखलेत यावर्षी शिष्यवृत्तीच्या स्पर्धात्मक परीक्षेत अनुज विजय चव्हाण व अदिती अमोल झाडे या दोन विद्यार्थ्यांनीने गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी शाळेत अतिरिक्त वर्ग घेतले जाते. शाळेतील दोन्ही विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षापर्यंत शासनाकडून शिष्यवृत्ती मिळणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय उच्च श्रेणी मुख्याध्यापक गजानन कासावार, पदवीधर शिक्षक चंदू परेकर, विजय चव्हाण व इतर शिक्षकांना दिले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.