भास्कर राऊत, मारेगाव: अधिक मासानिमित्त गडचांदूर जवळील अमळनळा धरणामध्ये स्नानासाठी गेलेल्या चोपण येथील तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दि.15 ऑगस्टच्या दुपारी घडली. या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव सतीश शंकर चिंचोलकर वय 32 असे आहे. सतीश हा चंद्रपूर येथील मयुर एंटरप्राइजेस या दुकानामध्ये व्हर्लपूल कंपनीचे काम करीत होता. 15 ऑगस्ट निमित्ताने त्याच्या ऑफिसला सुट्टी होती. त्यामुळे तो आपल्या मित्रमंडळींबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदुर येथील अमळणाला धरणामध्ये अधिक मासानिमित्ताने अंघोळीला गेलेला होता.
आंघोळीसाठी तो पाण्यात उतरला. त्याला पोहता येत नव्हते. तो थोडा पाण्यात समोर गेला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळ्या खायला लागला व बुडाला. त्यावेळी तेथे जवळच असलेले मासेमारी करणारे त्यांनी सतीशला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. शेवटी सतीशचा मृतदेहच हाती लागला.
एक दिवसापूर्वीच गेला होता चंद्रपूरला
सतीश हा मयुर एंटरप्रायझेस या दुकानामध्ये काम करायचा. रविवारी तो गावाला आईवडील याना भेटण्यासाठी यायचा. तो.13 ऑगस्टला रविवारी आपल्या कुटुंबियांना रविवारी भेटण्यासाठी आला होता. आणि सोमवारी जायची तयारी करीत असतांना सतीशच्या मोठया भावाची 3 वर्षाची मुलगी ही काकाला (सतीशला) आज नका जाऊ नं.. आजच्या दिवस थांबा अशी आर्त हाक मारत होती. परंतु दुकानचे काम असल्यामुळे सतीशने या छकुलीकडे मला जावे लागते असे म्हणत तो निघून गेला. आणि ते जाणे सतीशचे शेवटचेच जाणे ठरले.
सतीशच्या अपघाती मृत्यूमु़ळे परिसरात शोकक़ळा पसरली आहे. सतीशच्या पश्चात आईवडील, दोन भाऊ, आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
Comments are closed.