भुरकी येथील गावठाण जागेवरचे अतिक्रमण हटविण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील भुरकी ग्राम पंचायत अंतर्गत विस्तारित गावठाणमधील महसूलच्या खाली पडलेल्या प्लॉटवर असलेले अतिक्रमt[ण काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत बुधवार 23 ऑगस्ट रोजी उप विभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देण्यात आले.

भुरकी गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी तसेच अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करायचे आहे. त्यासाठी विस्तारित गावठाण मधील प्लॉट क्रमांक 30, 35 व 20, 21 वर बांधकाम करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. मात्र त्या प्लॉटवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण करून अस्थायी बांधकाम केले आहे. त्यामुळे बांधकाम करण्यात उशीर होत आहे.

ग्राम पंचायत कडून अतिक्रमण धारकांना 3 वेळ नोटीस देण्यात आली आहे. परंतु त्यांनी अद्याप अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी अतिक्रमण काढून जागा उपलब्ध करून देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनामार्फत केली आहे.

निवेदन देताना भुरकी ग्रा. पं. सरपंच सीमा बदकी, उप सरपंच विनोद दानव, प्रमोद सोनटक्के, दिलीप बदकी, एकनाथ मेश्राम, हरिदास उई, रवींद्र पेन्दोर, हरिभाऊ शेंडे, हरिश्चंद्र बदकी राहुल, मिलमिले, केलास कोहळे, विजय लांडगे, कमलाकर पोहे, कोमल देऊळकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.