25 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: येथील ग्रामीण रुग्णालयात अविकसीत जन्मलेल्या नवजात बाळाच्या प्रकरणी डॉ. महेन्द्र लोढा यांच्या कडून 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या दोघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कौशल्या शंकर बुजाडे (55) व नरेंद्र शंकर बुजाडे (35) रा. भगतसिंग नगर कनकवाडी, वणी असे खंडणी मागणाऱ्या आरोपींची नावे आहे. बाळाची आजी व वडील शहरातील काही लोकांना हाताशी धरून बदनामी व खंडणी उकळत असल्याचा आरोप डॉ. महेंन्द्र लोढा यांनी तक्रारीतून केला होता. याबाबतच्या कॉल रेकॉर्डिंग त्यांनी सादर केल्या होत्या. तक्रारीची शहानिशा करुन मंगळवार 5 सप्टे रोजी रात्री उशिरा मृत नवजात बाळाचे वडील आणि आजीवर भादंविच्या कलम 384, 385, 501, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 5 दिवसांपासून म्हणजेच 1 सप्टेंबर पासून बाळाचे पालक व नातेवाईक डॉ. लोढा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी उपोषणावर बसलेले आहे. मात्र आता त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणी काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Podar School 2025

काय आहे संपूर्ण प्रकरण?
भाग्यश्री नरेंद्र बुजाडे या वणीतील भगतसिंगनगर कनकवाडी येथील रहिवासी आहे. 28 जुलै रोजी त्यांची वणीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झाली. मात्र प्रसूत झालेल्या बाळाचे काही अवयव अविकसित होते. डॉ. लोढा यांनी सोनोग्राफी केल्यानंतर बाळाच्या वाढीबाबत पुरेशी माहिती दिली नाही. त्यामुळे अवयव अविकसीत झालेले बाळ जन्माला आले, असा आरोप नवजात बाळाच्या पालकांनी केला होता. त्यानंतर डॉ. लोढा यांच्याविरोधातील पोस्ट सोशल मीडियात पोस्ट व्हायरल करण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्यावर कारवाईची मागणी बाळाच्या पालकांनी केली होती. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गुरुवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर सदर प्रकरण चांगलेच तापले. बाळाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात जाऊन बाळाचे पोस्टमॉर्टम करण्याची मागणी लावून धरली होती. पोस्टमॉर्टम नंतर बाळाच्या नातेवाईकांनी लोढा हॉस्पिटलसमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली होती. अखेर शुक्रवारी दिनांक 1 सप्टेंबर पासून बाळाच्या नातेवाईक तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

25 लाखांची मागणी !
या प्रकरणी शनिवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी डॉ. महेंद्र लोढा यांनी सोशल मीडियातून एक आवाहन व्हायरल केले. त्यासोबत त्यांनी काही ऑडिओ क्लिप देखील जोडल्या. प्रकरण थांबवण्यासाठी बाळाच्या पालकांनी 25 लाखांची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी या पोस्टमधून केला. तसेच या प्रकरणी शहरातील काही तथाकथित समाजसेवक हात धुवून घेत असून मला बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 काय आहे ऑडिओ क्लिप मध्ये?
डॉ. लोढा यांच्याद्वारे व्हायरल करण्यात आलेल्या एका क्लिपमध्ये एक महिला मारेगाव येथील एका महिलेशी संवाद साधत असून त्यात ती 25 लाख दिल्यास आम्ही वणीतून निघून जाऊ. पैसे न दिल्यास आम्ही हे प्रकरण वर पर्यंत नेऊ अशी बोलत आहे. तसेच पैसे न दिल्यास आम्ही मागे लावलेले लोक डॉक्टरांची हजामत करणार असा संवाद देखील एका क्लिपमध्ये आहे.

दुस-या क्लिपमध्ये एक महिला आधी मध्यस्थीशी व नंतर डॉक्टर लोढा यांच्याशी बोलत आहे. यात ती महिला 25 लाखांची मागणी करीत आहे. आज संध्याकाळी 8 पर्यंत पैसे न दिल्यास उद्यापासून याचे तीव्र पडसाड पडणार असा संवाद साधत आहे. संवादात डॉक्टर लोढा हे बाळाचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयार बोलून दाखवत आहे. मात्र महिला 25 लाखांवर ठाम असून होणा-या परिणामास तयार राहावे असे बोलताना दिसत आहे.

डॉ. महेंद्र लोढा यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये अनेक खळबळजनक दावे केले असून त्यांनी या प्रकरणाच्या मागे शहरातील काही तथाकथित समाजसेवक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यातील एक समाजसेविकेने मध्यस्थीद्वारा 3 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा देखील केला आहे. तसेच बाळाला एक महिना उपचाराविना ठेवल्याने नवजात बाळाचा मृत्यू हा जंतू संसर्गाने झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. 

Comments are closed.