पुरुषोत्तम नवघरे, वणी: लायन्स इंग्लीश मिडीयम हायस्कूल, लायन्स कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून शिक्षक दिवस हा दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. शिक्षक दिवस प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य प्रशांत गोडे व प्राचार्या दिपासिंग परिहार उपस्थित होत्या. वर्ग सहा ते बि.एस.सी भाग 2 च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर व सन्मान व्यक्त करीत विवीध नृत्य व संदेशपूर्ण नाटक सादर केले. प्राचार्य प्रशांत गोडे यांनी शिक्षकांचे कर्तव्य तसेच शिक्षकांपूढे नवीन पिढीतील सुजान नागरीक घडविण्याकरीता असलेले आव्हान त्यांच्या प्रास्ताविक भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन कु. सुमय्या सैय्यद व कु. सामीया पटेल यांनी केले. उपस्थितांचे आभार कु. स्नेहल परबत हीने मानले. याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.