पुरुषोत्तम नवघरे, वणी: संस्कृत भारती वणी व आदर्श प्रशासकीय महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत सप्ताह साजरा करण्यात आला. दिनांक 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत संस्कृत सप्ताह निमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संस्कृत श्लोक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, संस्कृत कवी परिचय, संस्कृत कथा कथन स्पर्धा, संस्कृत लघु नाटिका इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांद्वारे वृक्षारोपण करण्यात आले. समारोपाच्या दिवशी आदर्श प्रशासकीय महाविद्यालयाचे संस्थापक रविंद्र गौरकर, सचिव पुरुषोत्तम नवघरे, संचालिका उज्ज्वला गौरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य निशांत खोब्रागडे, संस्कृत भारती वणीचे नगर मंत्री प्रा. महेश पुंड, प्रा. किसन किनाके, प्रा.प्रिया सावरकर, प्रा.पायल बरशेट्टीवार, प्रा.अमित काळे, प्रा. राहुल झाडे, प्रा.प्रणाली पत्रीवार, शुभम गानफाडे, प्राची मोहितकर , रुपेश आलाम, रंजना भंडारवार , सागर क्षिरसागर इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन संस्कृत भारती वणी चे नगर मंत्री प्रा.महेश पुंड यांनी केले तर उपस्थितांचे आभार सावरकर यांनी मानले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.