विवेक तोटेवार, वणी: मोहूर्ली येथे एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकली. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. यात 6 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. नितीन शामराव नागपुरे (34), राजू महादेव दुबे (52), वसंता विश्वनाथ कोडपे (59), ज्ञानेश्वर शंकरराव वडस्कर (49), अमोल दामोदर ढवस (34), राजू नीलकंठ आत्राम (48) सर्व राहणार मोहूर्ली असे अटक करण्यात आलेल्यांचे नावे आहेत. त्यांच्याकडून 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे व ठाणेदार अजित जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की, तालुक्यातील मोहूर्ली येथे एका घरात जुगार सुरू आहे. त्यांच्या आदेशाने पोलिसांचे पथक रेड गेले. घटनास्थळी गेल्या त्यांना एका बंद खोलीत काही इसम पत्ताच्या जुगार खेळताना आढळले. त्या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
चौकशीत त्यांनी त्यांची नावे नितीन शामराव नागपुरे (34), राजू महादेव दुबे (52), वसंता विश्वनाथ कोडपे (59), ज्ञानेश्वर शंकरराव वडस्कर (49), अमोल दोमोधर ढवस (34), राजू नीलकंठ आत्राम (48) असल्याचे सांगितले. या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी व जुगार साहित्य असा एकूण 16 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा नुसार कलम 4, 5 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बन्सोड, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या आदेशाने ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माधव शिंदे, हरींद्रकुमार भारती, पंकज उंबरकर, सुदर्शन वानोळे, विशाल गेडाम व चालक सुरेश किनाके यांनी केली.
Comments are closed.