रोहन आदेवार, वणी: वणी तालुक्यातील कुंड्रा या गावामध्ये दि. 12,1,2018 शुक्रवार रोजी युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले. वाचनालयाच्या उद्घाटनावेळेस कुंड्रा येथील सरपंच उषा गोरे, चंद्रशेखर कोंगरे (पोलीस पाटील), मुख्याध्यापक विनोद खारकर व युवासेनेचे शुभम सु गोरे यांनी मार्गदर्शन केले.
आजचं युग हे स्पर्धा परीक्षेचं युग आहे. ग्रामीण भागातील विद्यार्ध्यांना स्पर्धा परीक्षा तसंच वाचनासाठी पुस्तक सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता कुंड्रा गावातील नागरिकांनी गावामध्ये वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. गावक-यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि तरुणवर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
वाचनालयाचे उद्घाटन उषाताई सुधाकर गोरे (सरपंच ग्राम पंचायत कुंड्रा), प्रमुख पाहुणे चंद्रशेखर कोंगरे (पोलीस पाटील), मारोती पाटील थेरे(तंटामुक्त समिती अध्यक्ष), शालिनीताई नेताम (अंगणवाडी सेविका), स्वप्नील पाटील कुलमेथे (सदस्य) व्ही.व्ही.साखरकर(जि.प. प्रा. शाळा मुख्याद्यापक कुंड्रा) शुभम गोरे (युवासेना), स्वामी विवेकानंद ग्राम वाचनालयाचे अध्यक्ष मंगेश म गोरे, सचिव विकास मा गोरे, कोषाध्यक्ष मेघराज म खुलसंगे,सदस्य.विकास आसुटकर व गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.