नगर परिषद क्रीडा व कला महोत्सवाचा समारोप

शाळा क्रमांक सात ठरली अव्वल

0

देवेंद्र खरबडे, वणी: राष्ट्रमाता जिजाऊ तसेच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगर परिषद क्रीडा व कला महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. प्राथमिक शाळा क्र 3 येथे सायंकाळी 6:00 ला आयोजित करण्यात आला. या महोत्सवाचे बक्षिस वितरक वणी पंचायत समितीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे आणि नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.

दि.8 जाने. ते 12जाने. दरम्यान चाललेल्या या क्रीडा महोत्सवात प्राथमिक व उच्च प्राथमिक दोन्ही गटातील सर्व साधारण विजेतेपदाचा मान (चॅम्पियन शिल्ड) सलग पाचव्या वर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज न. प. उच्च प्राथमिक शाळा क्र 7 ला मिळाला. शाळा क्रमांक 7 ला 9 पैकी 3 स्पर्धेत विजेते व 4 स्पर्धेत उपविजेते मिळाले आहे. तर दोन्ही गटातील सर्व साधारण उपविजेता (उपचॅम्पियन) महात्मा गांधी न प उच्च प्राथमिक शाळा क्र 1 ठरली.

चांगला युवक घडवायचा असेल तर अशा क्रीडा महोत्सवांचे आयोजन झाले पाहिजे प्रतिपादन बक्षिस वितरणाच्या वेळी संजय पिंपळशेंडे यांनी व्यक्त केले. तर अशा महोत्सवांचे आयोजन दरवर्षी चांगल्या प्रकारे नगरपरिषद द्वारे केले जाईल असे आश्वासन नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मावळत्या शिक्षण सभापती स्वाती खरवडे, नवनियुक्त शिक्षण सभापती आरती वांढरे, नगरसेवक धनराज भोंगळे,संतोष पारखी, सुभाष वाघडकर, माया ढुरक, प्रीती बिडकर, रंजना उईके, प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, केंद्रसमन्वयक किशोर परसावार, मुख्याध्यापक गजानन कासावार, बंडूजी कांबळे उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.