अखेर खडकी ते अडेगाव मार्गाच्या कामाला सुरुवात
रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील अडेगाव हे गाव नेहमीच भाजपाचा बाल्लेकिल्ला असुन येथे पंचायत समीतीचा उमेदवार व ग्रामपंचायत वर नेहमी भाजपाचे वर्चस्व असते. गेल्या १५ वर्षांपासुन डबघाईस आलेल्या खडकी ते अडेगाव हा मुख्य रस्त्याच्या कामाला अखेर अडेगाव ग्रामवासी आणि मंगेश पाचभाई यांच्या पाठपुराव्यामुळे ३० डिसेंबरला सुरुवात झाली.
अडेगाव ह्या गावावर भाजपचे वर्चस्व असल्यामुळे कांग्रेस पक्षाच्या काळात हे गाव विकासाच्या बाबतीत नेहमीच दुर्लक्षित राहीले. अडेगाव हे गाव आमदारानी निवडुन आल्यानंतर दत्तक घेतले असुन खडकी ते अडेगाव प्र. जि. मा. क्रमांक ७१ ह्या मार्गाचे ह्यापुर्वी भूमीपूजन ३१ आक्टोबर २०१५ मधे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ह्यानी केले होते. त्यावेळी दोन वर्षात अडेगाव ते खडकी हा मुख्य रस्ता पुर्ण करु असा शब्द दिला होता. पण ह्या कामात कुठे मांजर आडवी आली हे तर कोनालाच माहीत नाही. हे काम पुर्ण न झाल्यामुळे मंगेश पाचभाई व ग्रामवासीयानी आमदाराकडे सतत पाठपुरावा केला.
त्यामुळे आमदारांच्या प्रयत्नामुळे ह्या मार्गावरील काम करण्यास निधी प्राप्त झाला व हे काम मनोज उंबरकर ह्या ठेकेदाराला देण्यात आले ह्या मार्गावरुन डोलोमाईट कंपन्याचे ३० ते ४० टनचे ट्रक आगमन करीत असल्यामुळे ह्या मार्गाचे काम सुध्दा उत्कृष्ट दर्जाचे झाले पाहीजे ह्याकडे सुध्दा आमदारांनी विशेष लक्ष द्यावे अशी ग्रामवासीयांची मांगणी आहे.
ह्या मार्गाच्या उदघाटनाच्या वेळेस या कार्यक्रमाला जिल्हा परीषद सदस्या संगीताताई सुरेश मानकर, पंचायत समिती सभापती लताताई आञाम, ग्रां. पं. सरपंच अडेगाव अरुणभाऊ हिवरकर, जीतेंद्र बोदकुरवार ईतर पदाधिकारी तसेच अडेगाव ग्रामवासी उपस्थित होते.
आमदार झाल्यानंतर अडेगाव हे गाव दत्तक घेतले असुन अडेगाव ला भरपूर प्रमाणात विकास कामे केली. अडीच वर्षाच्या आत अडेगाव ते खडकी हा मुख्य रस्ता पुर्ण करु असा शब्द दिला होता. पण ठेकेदार संघाचा संप आणि नव्याने समाविष्ट झालेल्या वस्तु व सेवा कर (जीएसटी) च्या कारणास्तव हा रस्ता पुर्ण व्हायला उशीर झाला. चार ते पाच महिन्यात हा रस्ता पुर्ण करण्यात येईल.:- आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार (वणी मतदार संघ.)