गोवंश जनावरांची तेलंगणात तस्करी, 3 बैलांची सुटका

शिरपूर पोलिसांची कार्यवाही, दोघांना अटक

 

जितेंद्र कोठारी, वणी : कत्तली करिता गोवंश जनावरांची तेलंगणा राज्यात तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वरुन शिरपूर पोलिसांनी मेंढोली फाट्याजवळ सापळा रचून महिंद्रा पिकअप वाहनात निर्दयीपणे कोंबून नेत असलेले 3 गोवंश बैलांची सुटका केली. पोलिसांनी पिकअप वाहन चालकासह दोघांना अटक करून गाडी जप्त केली. हरिदास लटारी गिरसावळे (60), रा. देऊरवाडा ता. वणी व अमोल विठ्ठल काकडे (27), रा. ढाकोरी (बोरी) असे गोवंश तस्करांचे नाव आहे.

वरोरा येथून वणी, शिरपूर मार्गे कोरपना कडे एका पांढऱ्या रंगाच्या वाहनात काही इसम गोवांशीय जनावरांना निर्दयीपणे कोंबून नेत आहे. अशी गोपनीय माहिती शिरपूर पोलिसांना रविवार 1 ऑक्टो. रोजी मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांचे आदेशाने पीएसआय कांडूरे यांनी पोलीस कर्मचारी व पंचासह मेंढोली फाटा येथे नाकाबंदी केली. सायंकाळी 4 वाजता दरम्यान वणी मार्गे येत असलेले महिंद्रा पीकअप क्र. MH 34 BG 2633 वाहनाला पोलिसांनी थांबविले. 

पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात 3 पांढरे रंगाचे गोवंशीय बैल निर्दयीपणे व क्रूरतेने आखूड दोरीने दाटीवाटीने बांधून दिसले. वाहनातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर बैल वरोरा येथून आणले आणि देऊरवाडा, बेला मार्गे आदिलाबाद येथे कत्तलिकरिता घेऊन जात असल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी आपले नाव हरिदास लटारी गिरसावळे रा. देऊरवाडा ता. वणी व अमोल विठ्ठल काकडे, रा. ढाकोरी (बोरी) असे सांगितले.

पोलिसांनी गोवंशीय जनावर 3 नग किंमत 66 हजार व महिंद्रा पिकअप वाहन किंमत 4 लाख असे एकूण 4 लाख 66 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्तीतील जनावरांची पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश डहाके यांचेकडून वैधकीय तपासणी करून चारा पाणीची व्यवस्था नसल्यामुळे रासा येथील श्रीराम गौरक्षण ट्रस्ट येथे पाठविण्यात आले.

अटक करण्यात आलेले आरोपी विरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनयमाचे कलम 11 (1), 11 (1)(c), 11 (1) (d), 11 (1) (g), महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम कलम 5 (अ), 5 (ब), 9, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 तसेच मोटर वाहन अधिनियम कलम 83 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.