रस्ते बांधणे म्हणजे विकास नव्हे: राजू उंबरकर यांचा आमदारांवर घणाघात

शेतक-यांच्या समस्या सुटल्या नाही तर आंदोलन....

विवेक तोटेवार, वणी: वणी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक कोळसा खाणी असून शेतकऱ्यांना वीज नाही, पाणी नाही सर्वाधिक शेतकरी आत्महत्या वणी विधानसभा क्षेत्रात होता आहे. कापसाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव मिळत नाही आहे, ‘फक्त रस्ते बांधणे म्हणजे विकास नव्हे’ असा घाणाघात मनसे नेता राजू उंबरकर यांनी बुधवार 25 ऑक्टोबर रोजी शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

वणी उपविभागात 18 कोळसा खाणी आहेत येथून निघालेला कोळसा वीजनिर्मिती प्रकल्पात जातो. येथील शेतकऱ्यांना फक्त 8 तास तेही रात्रीच्या वेळी वीज दिल्या जाते. यातही विजेचा लपंडाव सुरू असतो. गेल्या 45 वर्षापासून शेतकऱ्यांनी डिमांड भरून सुद्धा त्यांच्या अर्जाची पूर्तता केल्या गेली नाही. अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. पूरपीडितांच्या समस्या अजूनही संपल्या नाही त्यांना कुठलीही मदत अजूनही मिळाली नाही. यावरून सत्ताधारी आमदार हे शेतकऱ्यांना पाठिशी नाही हे दिसून येत आहे.

दोन वर्षांपूर्वी तालुक्याला पुराणे वेढा घातला होता ज्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यावर्षी शेतमालाला भाव नाही अशी समस्या आहे. मातोश्री पांदण योजनेअंतर्गत तालुक्यात कुठेही पांदण रस्त्याचे काम झाले नाही. गेल्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात न आल्यास मनसे आमदारांच्या घरासमोर पीडित शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.