जिप्सीचालकाला स्कूटी चालकाची रॉडने जबर मारहाण

साईड न दिल्यावरून वाद, साईमंदिराजवळील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: रस्त्याने जाताना साईड न देण्यावरून स्कूटीचालक व जिप्सीचालकात वाद झाला. यात स्कूटीचालकाने जिप्सी चालकाला रॉडने मारहाण केली. यात जिप्सीचालक जखमी झाला. बुधवारी रात्रीच्या सुमारास साईमंदिरजवळ यवतमाळ रोड येथे ही घटना घडली. या प्रकरणी स्कूटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुखविंदर हरबंत सिंग (42) हे मेहदूत कॉलोनी वणी येथील रहिवासी असून त्यांचे लालपुलिया परिसरात गॅरेज आहे. बुधवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास ते गॅरेज बंद करून त्याच्या मित्राला सोडालया त्यांच्या जिप्सी गाडीने टिळक चौकात गेले होते. मित्राला सोडून परत येताना त्यांच्या गाडीसमोर एक स्कूटी होती. त्या स्कूटीवर चालक आणि त्याचा सहकारी बसून होता. सुखविंदर यांनी साईड देण्यासाठी हॉर्न दिला. मात्र स्कूटीचालक साईड देत नव्हता. सुखविंदर यांनी गाडी थांबवून या दोघांना साईड का देत नाही याबाबत विचारणा केली व ते पुढे निघून गेले.

ते घरी जाताना यवतमाळ रोडवर मागून येऊ स्कूटीने त्यांना गाठले व शिविगाळ का केली अशी विचारणा करत त्यांच्याशी वाद घातला. सुखविंदर यांनी शिविगाळ केली नाही असे उत्तर देताच स्कूटीवरील एकाने त्यांच्या डोक्यावर रॉडने प्रहार केला. त्यामुळे यात त्यांचे डोके फुटले व ते खाली पडले. त्यानंतर दोघांनी त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. या वादात त्यांच्या गळ्यातील चैन गहाळ झाली.

त्यानंतर रात्रीच सुखविंदर यांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून एका अनोळखी आरोपीविरोधा भादंविच्या कलम 324, 34, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.